महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांचा उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सातपूर श्रमिकनगर परिसरातील गटसंघटिका वैशाली याळीज यांच्या माध्यमातून तयार झालेल्या विविध बचत गटांचा एकत्रित सिंहमेळावा यावेळी आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात शांती चैतन्य, शांती उदय, शांती संग्राम, शांती समुदाय, शांतीसागर, निर्मला, चौधरी, सुरेखा सोनवणे, संगीता पवार, पूजा गायकवाड, सुधा सावंत, ओवीग सावंत, आरती माळगावे, रेखा भवर, संगीता पालवे, रवीना मावळे, विमल पानसरे, बाबुंती पंडित, सुवर्णा पाटील, दिपाली झाल्टे, श्रद्धा शिंदे, प्रमिला जगताप, कमला मोहिते आदी महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
कार्यक्रमात माता रमाई यांच्या कार्याचा परिचय करून देत त्यांच्या त्याग, समर्पण आणि संघर्षमय जीवनातून कष्टकरी महिलांना मिळणारी प्रेरणा यावर मार्गदर्शन करण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्ग कसा निर्माण होतो, याची सविस्तर माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते यांनी दिली. तसेच उपस्थित बचत गटांचे मूल्यांकन करून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण बचत गट समन्वयक दिपालीताई मुकणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत संघटित शक्तीची जाणीव करून दिली. माता रमाई यांच्या प्रेरणेतून महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून समाजात सशक्त स्थान निर्माण करावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
Comments are closed.