नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक शहरात आता सर्वसामान्यांना मिळणार अवघ्या ६० रुपयांत किलोभर चणाडाळ मिळणार आहे. केंद्र सरकार, नाफेड, उपभोक्ता विभाग आणि श्री सप्तश्रृंगी कंपनी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जनतेला सणासुदीच्या काळात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती संतोष मुंदडा आणि अनंत राठी यांनी दिली.
‘भारत दाल’ या नावाने किलोभर चणाडाळ अवघ्या ६० रुपयांत उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ मंगलम कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्रभाग क्र. १५ मध्ये रविवारी करण्यात आला. द्वारका परिसरातील बनकर चौक येथे झालेल्या या कार्यक्रमास अर्चना थोरात आणि सुमन भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मिलिंद भालेराव, चंद्रकांत थोरात, रिक्षा सेनेचे नेते भगवंत पाठक, संतोष मुंदडा, अनंत राठी यांसह नागरिक उपस्थित होते. सदर योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे तसेच अधिक माहितीसाठी 9225100828 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संतोष मुंदडा आणि अनंत राठी यांनी केले आहे.