नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
साहसी व्यक्ती अशी ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील हिमांशु साबळे याने अनोखी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीत सुरु असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हिमांशुने सहकाऱ्यांबरोबरच 14 हजार फूट उंचीवरुन उडी घेतली.
भारताला पहिल्यांदाच जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद मिळाले आहे. या परिषदेनिमित्त भारत सध्या जगभरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या परिषदेकडे आहे. याच महत्त्वपूर्ण प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी आणि राष्ट्राचा अभिमान आणि सन्मान करण्यासाठी भारताच्या हिमांशुने भन्नाट विक्रम केला आहे. स्कायडायव्हर्सच्या एका टीमचा भाग असलेल्या हिमांशुने सहकाऱ्यांबरोबरच 14 हजार फूट उंचीवरुन उडी घेतली. रशियामधील ढगांच्या वर जी-20 चे चिन्ह असलेला ध्वज हिमांशुने आपल्या या भन्नाट उडीदरम्यान झळकावला. ही मोहीम प्रतीकात्मक आणि विस्मयणीय ठरली. या मोहिमेच्या माध्यमातून त्याने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक सहकार्य आणि मुत्सद्देगिरीसंदर्भात भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व या माध्यमातून करण्यात आलं.