NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे मराठी दिन उत्साहात

  • विद्यार्थ्यांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम; प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

सेंट फ्रान्सिस हायस्कूल शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अगस्टीन पिंटो, संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर ग्रेस पिंटो, यांच्या मार्गदर्शनाद्वारे मराठी दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जाजू विद्यालयाचे मराठी विषयाचे माध्यमिक विभागाचे शिक्षक हरिदास चौधरी सर यांची उपस्थिती लाभली.

यावेळी इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने व पवित्र ग्रंथ बायबल मधील पठनानी झाली . त्यानंतर सुंदर अशी प्रार्थना गीते सादर करण्यात आली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी नी नृत्य सादर केले. तेजल पाटील या विद्यार्थिनीने मराठी भाषेचे महत्व विशद केले. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच मराठी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मध्ये. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात काव्य लेखन स्पर्धा, शीघ्र वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवर अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मान्यवर अतिथींच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दुसऱ्या भाषेचा आदर करण्याबरोबरच आपल्या अभिजात मराठी भाषेचा सन्मान वाढवावा असे मान्यवर अतिथींनी आपल्या भाषणात नमूद केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे, शितल चिंचोलीकर व इतर शिक्षक वृंदांनी प्रयत्न केले .

Comments are closed.