NGN News
Latest Marathi News

मराठा समाजाचा निर्धार : ३ ऑगस्टला ऐतिहासिक एकजूट घडविण्याचा संकल्प

विंचुर : मच्छिंद्र साळुंके

खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा स्मारक मंदिरात मराठा समाजाची भव्य नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस निफाड, येवला, सिन्नर तालुक्यांतील शेकडो मराठा बांधवांनी उत्स्फूर्त हजेरी लावत समाजाच्या एकजुटीचा निर्धार केला.

या बैठकीत येत्या दि.३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागत सोहळ्याची तयारी अंतिम करण्यात आली. अंदाजे ५० हजारांहून अधिक जनसमुदाय या सोहळ्यासाठी उपस्थित राहील, असे आयोजकांनी सांगितले. यासाठी वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा व सुरक्षेचे काटेकोर नियोजन करण्याचे ठरले. यासोबतच निफाड, येवला व सिन्नर तालुक्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याचा आणि समाजबांधवांना दि.३ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी एकत्र आणण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

बैठकीस प्रवीण कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रसाद फापाळे, अभिजित डुकरे, राजेश भडांगे, राहुल वाघ, धर्मराज घोटेकर, विजय गिते, राहुल घोटेकर, गणेश गोरडे, अजय सदाफळ, अजिंक्य साबळे, अमोल मेमाणे, कल्पेश वायकर, भैय्या घोटेकर, अनिकेत साबळे, सागर भारस्कर, नारायण सदाफळ, ऋषी घोटेकर, अनिल सदाफळ, बाबा गोसावी, प्रदीप परदेशी, निलेश घोटेकर, सागर सदाफळ, शरद गिते, सुनील माळी, विठ्ठल बेर्डे, विष्णू मेमाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून संयोजनात योगदान दिले.

“आपली पाऊलेच आपली ताकद, आपली उपस्थितीच आपला विजय” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. युवकांची ऊर्जा, महिलांची तयारी आणि ज्येष्ठांचा पाठिंबा यामुळे ३ ऑगस्टचा कार्यक्रम मराठा समाजाच्या ऐतिहासिक एकतेचा पुरावा ठरेल, असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Comments are closed.