मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोघे वगळता इतर सर्व आमदार आमच्या संपर्कात असून मुंबई महापालिका निवडणुकींपूर्वी या आमदारांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होईल, असा दावा आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रचंड नाराजी असून ती वस्तुतः खासदार संजय राऊत यांच्याबाबत आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, तुमाने यांच्या दाव्याला शिंदे यांच्या पक्षाचे ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांनी दुजोरा दिला आहे.
आम्ही धमाका देणार आहोत. त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून उर्वरित सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांचे 80 टक्के आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमचा दसरा मेळावा झाला की, सर्व आमदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित करु. सर्वांचा पक्षप्रवेश करु, अशी माहिती तुमाने यांनी दिली. उबाठाचे दोन आमदार सोडून इतर आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, तुमाने यांच्या दाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दुजोरा दिला आहे. दिवाळीच्या नंतर मोठा धमाका होणार आहे, असे उदय सामंत म्हणाले. तुमाने यांनी तुम्हाला दिलेली माहिती गोपनीय असावी. गोपनीय माहितीवर जास्त चर्चा होत नाही. दिवाळीनंतर धमाका होईल, असे सामंत म्हणाले
Comments are closed.