- भावभावना, विचार आणि जीवनातील नातेसंबंधांचा हळुवार मागोवा घेणारी साहित्यकृती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
लेखिका अपर्णा मारावार यांच्या ‘मनवेध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच नाशिक येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन हॉटेल एनराईज बाय सयाजी, इंदिरानगर (जॉगिंग ट्रॅक समोर) येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविवर्य प्रा. अशोक बागवे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. सतीश सोळांकूरकर आणि पं. अविराज तायडे उपस्थित होते. ‘मनवेध’ या ग्रंथामधून लेखिका अपर्णा मारावार यांनी मानवी भावभावनांचा, विचारांचा आणि जीवनातील नातेसंबंधांचा हळुवार मागोवा घेतला आहे. पुस्तकातील आशय व भाषाशैली यांचा संगम वाचकांना अंतर्मुख करतो, असे प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमास साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच वाचकवर्गाची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी लेखिकेचे अभिनंदन केले आणि ‘मनवेध’ या पुस्तकास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.