NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

भाम काळुस्ते धरणालगत मांजरगाव-आंबेवाडी रस्ता बंद; कारण ‘हे’.. 

0

घोटी/राहुल सुराणा

भाम धरणाला वळसा मारून मांजरगाव-आंबेवाडीकडे गेलेल्या रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सावधानी म्हणुन पर्यटक तथा जाणारे येणाऱ्या स्थानिक नागरिकांना रस्त्यावरून जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे.

याबाबत तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या आदेशाने आपत्ती व्यवस्थापन विभाग, पंचायत समिती बांधकाम विभाग, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस प्रशासनाने उपस्थित राहत येथील रहदारी संपूर्णपणे बंद केल्याबाबतचा फलक लावून मार्ग निर्मनुष्य केला आहे. याच मार्गावर मागील तीन ते चार वर्षी सलग दरड कोसळल्याने व धरणाचा बॅंक वॉटर सदर परिसरात असल्याने या ठिकाणी मोठी खाई निर्माण झालेली आहे. वरील बाजूला मोठा धबधबा असल्याने पर्यटक व खुशकीचा मार्ग आसल्याने स्थानिक नागरिक ये-जा करण्याचे प्रमाण अधिक आहे. या मार्गाने जाण्यासाठी कोणीही जोखीम पत्करून नये असे सक्त आदेश तहसीलदार अभिजित बारवकर, घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिले आहे.

या करीता स्थानिक पातळीवर दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे ही सांगण्यात आले आहे. उंच पुऱ्या डोंगराला कोरून पायथ्या लगत रस्ता नेल्याने दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. पर्यटक व नागरिकांनी अधिकची सतर्कता म्हणुन ये-जा करण्यासाठी कोणीही मज्जाव करू नये.

यावेळी तलाठी वर्षा देशमुख, ग्रामसेवक आनंदसिंग पाटील, पोलीस हवालदार सागर सौदागर, संतोष नागरे व शाखा अभियंता शेख उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.