** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील रहिवासी उदय नितीन पाटील यांना कर्नाटक स्थित प्रतिष्ठित मणिपाल विद्यापीठाकडून जिओपॉलिटिक्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या प्रबंन्धाचा विषय ‘युएस फॉरेन पॉलिसी टुवर्ड्स चायना फ्रॉम क्लिंटन टू ट्रम्प: इवोलूशन,डिटरमिनांट्स अँड इम्प्लिकेशन्स’ असा होता.सदर प्रबंधामध्ये त्यांनी अमेरिकेच्या शीत युद्धानंतरची चिन नीती व तिचे जागतिक व्यवस्थेसाठी असलेले परिणाम यावर संशोधन केले.डॉ.उदय नितीन पाटील यांनी यापूर्वी संरक्षण व सामरिक शास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एम.एस्सी.पदवी प्राप्त केली असून त्याच विषयात नेट परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे.त्यांनी जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२५ ह्या काळात पूर्णवेळ संशोधन केले. डॉ.उदय पाटील यांचे शोधनिबंध व लेख ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील विविध प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत.त्यांना ह्या संशोधनासाठी टी.एम. ए.पै.फेलोशिप प्रदान करण्यात आलेली होती.
डॉ.उदय पाटील यास डॉ.धनश्री जयराम,वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक-गाईड.
डॉ.आनंद व्ही,वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक – को-गाईड
डॉ.अमृता जश, सहाय्यक प्राध्यापक, जियोपॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल डिपार्टमेंट, मणिपाल विद्यापीठ,यांप्रमाणेच .
डॉ.समीर पाटील संचालक,ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन,दिल्ली यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्रा.डॉ.गायत्री प्रभू,संचालक,मणिपाल स्कूल ऑफ सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज,मणिपाल विद्यापीठ.प्रा.डॉ.के.पी. विजयलक्ष्मी,विभाग प्रमुख,जियोपॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल डिपार्टमेंट,मणिपाल विद्यापीठ,व प्रा.डॉ.रवींद्रनाथन,डॉ. विघ्नेश राम,डॉ. नदीम अहमद,डॉ.सुशांत पराशर यांनी अभिनंदन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थीतीत डॉ.उदय नितीन पाटील यांना पदवी प्रदान करण्यात आली.
——-
@ माझ्या पिएचडीच्या यशाने मला खूप आनंद आणि समाधान मिळाले आहे.माझ्या कुटुंबीय, मित्र आणि मार्गदर्शकांच्या समर्थनाशिवाय हे शक्य झाले नसते. मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो.
-डॉ.उदय पाटील
पिंपळनेर,जि.धुळे
Comments are closed.