इस्लामाबाद/एनजीएन नेटवर्क
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 110 वयात चौथ्यांदा लग्न केले आहे. हा विवाह करण्यासाठी या व्यक्तीने 5000 रुपयांची मेहेरही दिली आहे. वयस्कर व्यक्तीच्या या कारनाम्यामुळे आता या कुटुंबाची खूप चर्चा पाकिस्तानसोबतच जगभरात होत आहेत. कारण या 110 वर्षीय व्यक्तीच्या या कुटुंबात एकूण 84 लोक आहेत. आता ही संख्या आणखी कितीने वाढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अब्दुल हन्नान असे या ११० वर्षीय वृद्धाचे नाव आहे. अब्दुल हन्नानने आता आयुष्यातील चौथा विवाह केला. यावेळी त्यांनी 55 वर्षीय महिलेशी विवाह केला आहे. काझी मोहम्मद अर्शद यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला परिसरातील मोठ्या हस्तींनी उपस्थिती लावली. अनेक मान्यवर आपल्या परिवारासह येथे उपस्थित होते. मानसेरा जिल्ह्याचे माजी नगरसेवक खालिद खान यांनीही या लग्नाला हजेरी लावली आणि त्याचे साक्षीदारही बनले. उपस्थित वऱ्हाड्यांपैकी कोणालाही हा काही वेगळा प्रकार घडतोय असे वाटत नव्हते. कोणीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता आनंदाने सोहळ्यात सहभाग दर्शवला.