नाशिक/एनजीएन नेटवर्क
शहरामध्ये गुरूवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन करण्यात जप्त करण्यात आले आहेत.
तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली असता म्हसरूळ येथील केंद्राबाहेर एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका तरूणाला अटक केली असून यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशयिताचे कोणी साथीदार आहेत का याचाही तपास सुरू आहे.