NGN News
Latest Marathi News

मालेगाव महापालिका त्रिशंकू; इस्लाम पार्टीला सर्वाधिक ३५ जागा

  • एमआयएम २०, शिवसेना १८, समाजवादी पार्टी ६ ठिकाणी विजयी

मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

मुस्लीम बहुल मालेगाव महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. एकूण ८४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पार्टीने ३५ जागांवर विजय मिळवला. एमआयएमने २०, समाजवादी पार्टीने ६, काँग्रेसने ३ जागांवर विजयी मोहोर उमटवली आहे. शिवसेनेने देखील १८ जागा खिशात घालून हिंदुबहुल प्रभागांमध्ये आपले वर्चस्व सिध्द केले. भाजपने इथे २० जागांवर निवडणूक लढवली होती, या पक्षाला अवघ्या २ जागांवर त्यांना समाधान मानावं लागले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ १६५ मतांनी पराभव स्वीकाराव्या लागलेल्या माजी आमदार आसिफ शेख यांच्याविषयीच्या सहानुभूतीचा इस्लाम पार्टीला फायदा झाल्याचे स्प्पाष्ट झाले आहे. दुसरीकडे मालेगाव मध्य मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या एमआयएम पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांना अपेक्षित जागा राखता आल्या नाहीत. त्यांना केवळ २० जागा मिळाल्या. एमआयएमला अतिआत्मविश्वास नदलाची चर्चा आहे.

शिवसेना यशाचे श्रेय मंत्री भुसे यांना

महापालिकेत शिवसेनेला १८ जागा प्राप्त झाल्या. या दखलपात्र यशाचे श्रेय मालेगाव बाह्यचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दिले जाते. हिंदू बहुल प्रभागांमध्ये योग्य उमेदवार देत प्रचाराची योग्य रणनीती आखून भुसे यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. मालेगावमध्ये त्रिशंकू अवस्था असली तरी इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्ष आघाडी करून सत्दोता स्न्हीथापन करतील, असे चित्र सध्या आहे.

Comments are closed.