ठाणे/एनजीएन नेटवर्क
मुंबई-नाशिक महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर तीन प्रवासी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कल्याणजवळ मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर आणि काळी पिवळी जीप (विद्यार्थी असलेली) पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. अनेक वर्षांपासून या भागात उड्डाण पुलाची मागणी केली जाते आहे. तीन वेळा ग्रामस्थांनी आंदोलन करुन टोलनाकाही बंद केला होता. मात्र प्रशासनाकडून उड्डाण पूल बांधण्यासाठी काहीही हालचाली केल्या गेल्या नाहीत. आज झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.