नाशिक/एनजीएन नेटवर्क
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने मोठे संघटनात्मक बदल जाहीर केले आहेत. राज्यभरात सुमारे ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांतर्गत नाशिक जिल्ह्याच्या नेतृत्वातही महत्वपूर्ण बदल घोषित करण्यात आले आहेत. नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे तीन विभागांमध्ये जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली, यामध्ये नाशिक ग्रामीण दक्षिण सुनील बच्छाव, ग्रामीण दिंडोरी शंकर वाघ, मालेगावसाठी निलेश कचवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिकचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जाधव याआधी शहर सरचिटणीस पदावर कार्यरत होते. त्यांना बढती मिळाल्याचे मानले जात आहे. सुनील बच्छाव कसमादे पट्ट्यातील हे एक धडाडीचे नेते मानले जातात तर निफाडचे शंकर वाघ हे पक्षाचे निष्ठावंत पाईक म्हणून गणले जातात. सरचिटणीस म्हणूनही धुरा सांभाळली आहे.