NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाबाबत फडणवीसांची ‘ही’ घोषणा

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून विधानपरिषदेतही गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( ठाकरे ) गट आमदार अनिल परब यांनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी घोषित केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचे पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.