NGN News
Latest Marathi News

पंचवटीतील गोळीबार प्रकरणाचा म्होरक्या गुंडाविरोधी पथकाकडून जेरबंद

विकी वाघ याच्या वणी येथे मुसक्या आवळल्या

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पंचवटीतील सागर सागर जाधव याच्यावर गोळीबार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा म्होरक्या विकी वाघ याच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुंडाविरोधी पथकाने वणी येथून त्याला ताब्यात घेतले आहे.

गेल्या १७ सप्टेंबर रोजी नाशिकच्या पेठरोड परिसरात सागर जाधव या युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्वयामध्र्चये सागर गंभीर जखमी झाला होता. वर्स्वचवाद हे त्याचे मूळ असल्याचे सांगण्यात येत होते. या प्रकरणातील चौदा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तथापि या टोळक्याचा म्होरक्या विकी वाघ हा फरार होता. तो दिंडोरीच्या वणी येथे येणार असल्याची टीप गुंडाविरोधी पथकाला मिळाल्यानंतर सापळा राच्यांत येयून त्यास शिताफीने अटक करण्यात आली.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ. विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे यांनी ही कामगिरी बजावली.

Comments are closed.