NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

महिंद्राने लॉन्च केले XUV700 एबोनी लिमिटेड एडिशन

0

मुंबई : भारतातील आघाडीची एसयूव्ही मॅन्युफॅक्चरर कंपनी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने XUV700 एबोनी लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. हा एक नवा, अतिशय अद्भुत अवतार XUV700 चे अनोखे व्यक्तिमत्व आणि सोफिस्टिकेटेड डिझाईन यांना अजून चांगले बनवतो. या एक्सक्लुसिव्ह व्हेरियंटच्या किमती 19.64 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) पुढे आहेत. आपल्या आकर्षक ड्युएल ब्लॅक-अँड-सिल्वर एस्थेटिक्ससह XUV700 एबोनी लिमिटेड एडिशन ‘आउटशाईन द डार्क’ अर्थात अंधारावर मात करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.


प्रभावशाली आणि अतुलनीय एक्स्टीरियर

महिंद्रा XUV700 एबोनी एडिशन अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहे ज्यांना इतरांमध्ये मिसळण्याऐवजी वेगळी ओळख निर्माण करणे आणि आपले व्यक्तिमत्त्व टिकवून ठेवणे आवडते. ब्रश्ड सिल्वर स्किड प्लेट्ससोबत स्टेल्थ ब्लॅक एस्टीरियर तिचे वैशिष्ट्य आहे. ब्लॅक-ऑन-ब्लॅक ग्रील इन्सर्ट आणि ब्लॅक-आउट ORVMs एक शानदार फ्रंट प्रोफाइल बनवतात, R18 ब्लॅक अलॉय व्हील्स SUV च्या शानदार स्टान्सला एक छान लुक देतात. ब्लॅक आणि सिल्वरचा हा अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आलेला मिलाप XUV700 च्या प्रत्येक प्रकारच्या रस्त्यावर आत्मविश्वास जागवणाऱ्या अतुलनीय डिझाईन फिलॉसॉफीला अधोरेखित करतो.


जास्त सुविधा आणि जास्त आराम देणारे इंटेरियर
कारच्या आत पाऊल ठेवल्याबरोबर तुम्हाला दिसते एक उठावदार आणि अतिशय सुंदर केबिन लेआऊट. ब्लॅक लेदरेट अपहोल्स्टरी, ब्लॅक आउट ट्रीम्स आणि सेंटर कन्सोल, डोअर पॅनलसह सिल्वर ऍक्सेंट यांचा यामध्ये समावेश आहे. त्याला साजेसा लाईट ग्रे रूफ लायनर ड्युअल टोन थीम दर्शवतो, जो इंटेरियरला सोफिस्टिकेशनचा स्पर्श देतो. डार्क क्रोम एयर वेन्ट XUV700 एबोनी एडिशनच्या प्रीमियम फीलला अजून जास्त वाढवतात आणि एक अशी जागा निर्माण करतात जिथे आधुनिक लक्झरी आणि शान यांना एकत्र जोडले गेले आहे.


आत्मविश्वासू लोकांसाठी तयार करण्यात आलेले

महिंद्राच्या सिद्धांतांनुसार, XUV700 एबोनी एडिशन अशा लोकांसाठी डिझाईन करण्यात आले आहे ज्यांना उत्कृष्टतेच्या बाबतीत जराही तडजोड करणे मान्य नसते. हे लिमिटेड एडिशन अशा लोकांसाठी आहे जे विचारपूर्वक करण्यात आलेली कारिगरी आणि नवीन तंत्रज्ञानाला महत्त्व देतात. आनंद आणि उत्साहाने भरलेला वीकएंड असो नाहीतर, आठवड्याच्या दिवसांमध्ये शोफर्ड ड्रायविंग असो, एबोनी एडिशन अपस्केल एसयूव्ही अनुभव प्रदान करण्यासाठी सज्ज आहे, यामध्ये आराम, क्षमता आणि कमांडिंग डिझाईन यांचा मिलाप आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.