- आगामी हंगामात वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- उद्देशपूर्ण पद्धतीने तयार केलेली OJA 2130 ट्रॅक्टर मालिका भारतीय शेतकऱ्यांसाठी उत्पादकता,
आराम वाढवून किंमतीच्या दृष्टीने किफायतशीर अशी डिझाइन करण्यात आली आहे. - कार्यक्षमता आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी या मॉडेल्समध्ये मानक स्वरूपात 4WD,
सर्वोत्तम पॉवर-टू-वेट गुणोत्तर आणि इम्प्लिमेंट सुसंगतता देण्यात आली आहे.
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
महिंद्रा ग्रुपचा भाग आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड महिंद्रा ट्रॅक्टर्स भविष्यासाठी सज्ज असलेल्या OJA ट्रॅक्टर्सच्या श्रेणीवर आधारित OJA 2130 मालिकेचे उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. OJA 2130 मालिका OJA 2130 – PROJA म्हणून 30 HP श्रेणीत OJA 2130 लार्ज टायर (9.5×18 टायर्ससह) आणि OJA 2130 नॅरो ट्रॅक विथ FR (फॉरवर्ड + रिव्हर्स) शटल अशा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
OJA 2130 मालिकेद्वारे महिंद्रा प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि बहुपयोगी उपायसुविधा सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. त्यायोगे बागायती, द्राक्षबाग, इंटरकल्चरल शेती, ऊस आणि कापूस यांसारख्या विविध शेतीप्रकारांसाठी विश्वासार्ह ट्रॅक्टर कार्यक्षमता मिळेल आणि प्रगतिशील शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण होतील.
भक्कम कोअर तंत्रज्ञानावर आधारित OJA प्लॅटफॉर्म कार्यक्षमता आणि एकूण वापरकर्ता अनुभव लक्षणीयरीत्या सुधारतो. सर्वोत्तम पॉवर-टू-वेट गुणोत्तरामुळे OJA 2130 मालिका विविध शेतीकामांसाठी अधिक शक्ती आणि लवचिकता पुरवते. मानक 4WD मुळे विविध प्रकारच्या भूभागांमध्ये ट्रॅक्शन आणि उत्पादकता सुनिश्चित होते.
नवीन OJA ट्रॅक्टर मालिकेच्या केंद्रस्थानी प्रगत आणि शक्तिशाली तीन-सिलेंडर DI इंजिन आहे. ते 83.7 Nm टॉर्क पुरविते. उच्च बॅक-अप टॉर्कसह हे इंजिन उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि उत्तम लगिंग क्षमता देखील देते. नवीन OJA ट्रॅक्टर मालिका अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून त्यामुळे तिची कार्यक्षमता आणि वापरकर्ता अनुभव उंचावतो. या ट्रॅक्टर्समध्ये सर्वोत्तम टर्निंग रेडियस आणि ग्राउंड क्लीयरन्स असल्यामुळे अगदी अरुंद जागेतही ते अत्यंत सहजपणे चालवता येतात.
इलेक्ट्रॉनिक ड्राफ्ट अँड डेप्थ कंट्रोल (EDDC) आणि हिच पॉईंटवर 950 kg लिफ्ट क्षमता यांसारखी वैशिष्ट्ये नवीन OJA ट्रॅक्टर्सना विविध शेतीकामांसाठी शक्ती आणि अचूकता पुरवितात. त्यामुळे शेतकऱ्यांना बहुपयोगीपणा आणि कार्यक्षमता दोन्ही मिळते. उद्योगातील पहिल्यांदाच देण्यात आलेले ऑटोमेशन कंट्रोल्समुळे अधिक अचूकता आणि वापरातील सुलभता मिळते.
जोडीला हा प्लॅटफॉर्म ऑपरेटरच्या आरामाचा विचार करून डिझाइन करण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये उद्योगातील पहिल्यांदाच देण्यात आलेले टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग तसेच साइड-शिफ्ट कंट्रोल्स यांचा समावेश आहे. OJA श्रेणी प्रत्येक पिकाच्या चक्रात कमी कामकाज खर्च आणि कालांतराने कमी देखभाल खर्च यामुळे किंमतीच्या दृष्टीनेही किफायतशीर ठरत आहे.
महिंद्रा ट्रॅक्टर्स (TBC)चे विक्री, विपणन आणि राष्ट्रीय व्यवसाय कामकाज प्रमुख परिक्षित घोष म्हणाले, “OJA ही उर्जेची एक शक्तीशाली निर्मिती आहे आणि महिंद्रा ट्रॅक्टर्समध्ये आम्ही बागायती, ऊस, कापूस इत्यादी महत्त्वाच्या विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजांसाठी OJA 2130 मालिकेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. या ट्रॅक्टर्सद्वारे महिंद्रा 21-30hp विभागातील आपले नेतृत्व अधिक मजबूत करत आहे आणि तंत्रज्ञानाधारित उपायांद्वारे देशभरातील शेती पद्धतींमध्ये परिवर्तन घडवून शेतकऱ्यांना सक्षम बनवत आहे.”
OJA 2130 – PROJA प्रकार
OJA 2130 PROJA प्रकाराला प्रॉडक्टिव्हिटी मॉडेल म्हणूनही ओळखले जाते. प्रत्येक शेतीकामामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता देण्यासाठी हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. यामधील F/R शटल सुधारित रिव्हर्स स्पीड पर्याय देऊन मॅन्युव्हरॅबिलिटी (अरुंद जागेत किंवा वेगवेगळ्या दिशांनी ट्रॅक्टर सहजपणे वळवण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता) वाढवते. परत परत केल्या जाणाऱ्या शेतातील कामांसाठी हे उपयुक्त आहे. अत्यंत अचूकतेची आवश्यकता असलेल्या कामांसाठी क्रिपर मोड अल्ट्रा लो स्पीड ड्रायव्हिंग सक्षम करते. त्यामुळे अचूक बी पेरणी आणि लागवड कामे सुलभ होतात.
शक्तिशाली प्रोजेक्टर लॅम्प्स अखंड 24/7 कामकाजाला समर्थन देतात आणि दाट शेतातही उत्कृष्ट दृश्यमानता पुरवितात. वेट इलेक्ट्रिक पीटीओ विविध जोडणीसह अखंड विनाअडथळा कामगिरी सुनिश्चित करते. त्यामुळे उत्पादकता वाढते आणि PTO-प्रणीत कामांच्या दीर्घ कालावधीत ऑपरेटरचा थकवा कमी होतो. याच्या केंद्रस्थानी असलेले 3DI इंजिन उत्कृष्ट NVH सह सुरळीत कामगिरी आणि उच्च टॉर्क पुरविते. त्यामुळे हे जड कामांसाठीही विश्वासार्ह ठरते. याला पूरक म्हणून टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टीयरिंग देण्यात आले आहे. यामुळे दीर्घ कामकाजाच्या चक्रांमध्ये ऑपरेटरला अधिक आराम आणि सुलभता मिळते.
OJA 2130 नॅरो ट्रॅक विथ FR शटल
OJA 2130 नॅरो ट्रॅक विथ FR शफल हा ट्रॅक्टर ओळींमधील अंतर अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या विशिष्ट पिकांच्या गरजांसाठी विकसित करण्यात आला आहे. 914 mm अरुंद ट्रॅक रुंदी आणि कॉम्पॅक्ट 8×18 इंच टायर्ससह हा नवीन ट्रॅक्टर ऊस, कापूस, केळी आणि बागायती शेतीसाठी अत्यंत योग्य आहे.
या ट्रॅक्टरमध्ये 8 फॉरवर्ड + 8 रिव्हर्स गिअरबॉक्स FR शटल सह देण्यात आला आहे. त्यामुळे ऑपरेटरला वारंवार दिशा बदल सहजपणे करता येतात. या प्रकारात टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टीयरिंग देखील देण्यात आले असून त्यामुळे दीर्घकाळ कामकाजादरम्यान उत्कृष्ट आराम आणि नियंत्रण मिळते.
अरुंद ट्रॅक डिझाइन आणि शेतकरी-अनुकूल एर्गोनॉमिक्स यांच्या एकत्रीकरणामुळे OJA 2130 नॅरो ट्रॅक FR शटल हा वेग आणि अचूकता आवश्यक असलेल्या विशेष पिकांच्या उपयोजनांसाठी अत्यंत योग्य पर्याय ठरतो.
OJA 2130 विथ लार्जर 9.5×18 टायर्स
मोठ्या टायर्ससह असलेला OJA 2130 हा बहुपयोगी ऑल-राऊंडर म्हणून डिझाइन करण्यात आला असून विविध प्रकारच्या शेतीच्या परिस्थितींमध्ये उपयुक्त ठरतो. हा ट्रॅक्टर सपाट, वरखाली असलेल्या किंवा आव्हानात्मक भूभागांवरही अधिक स्थिरता आणि उत्कृष्ट ट्रॅक्शन प्रदान करतो.
नवीन ट्रॅक्टरमध्ये 8 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स गिअर कॉन्फिगरेशन देण्यात आले आहे. त्यातून अधिक सुरळीत गिअर शिफ्टिंग, उत्तम इंधन कार्यक्षमता आणि वाहतूक तसेच शेतातील कामांदरम्यान उत्कृष्ट कामगिरी सुनिश्चित होते. त्यामुळे OJA 2130 लार्ज टायर प्रकार विविध पिकांच्या गरजांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरतो.
महिंद्राच्या उद्योगातील सर्वोत्तम सहा वर्षांच्या वॉरंटीच्या पाठबळासह नवीन OJA ट्रॅक्टर्स टिकाऊपणा आणि दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी विकसित करण्यात आले असून ते देशभरातील महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या डीलरशिपमध्ये उपलब्ध आहेत.
Comments are closed.