NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

देशातील महत्त्वाच्या शहरात सौरऊर्जा बाजारपेठेत महिंद्रा सोलाराइझचा पुढाकार

0

नाशिक : महेंद्र ग्रुपने सुरू केलेल्या महेंद्र सोलराइज ही सौरऊर्जा संबंधित प्रकल्प आता देशातील विविध शहरांत आपली सेवा देण्यास सज्ज झाला आहे. देशातील विविध राज्यांतील शहरांत ही सेवा पुरविणे हे महेंद्र सोलराइजचे मुख्य उद्दिष्ट आहे. नाशिक या प्रमुख शहरांत ही सेवा देण्यावर महेंद्र सोलराइजने लक्ष केंद्रित केले आहे. महेंद्र सोलराइज कंपनीच्या सोलार एपीजी विभागाकडून या शहरांत वितरित केली जाणार आहे.

या शहरांत सौरउर्जेचा योग्य वापर होण्यासाठी महेंद्र सोलराइज हे प्रत्येक घराच्या छतावर बसविले गेले पाहिजे, हे कंपनीचे प्रमुख टार्गेट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वार्षिक २० ते २५ टक्के नफा मिळावा, असेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यंदाचा वार्षिक बजेट सादर करताना केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर
करण्यात आली. सौरऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले. साहजिकच सौरऊर्जेशी संबंधित घरातील छतावर सौरऊर्जा मशिन्स लावण्याच्या नव्या कामाच्या संधीही बाजारपेठेत निर्माण झाल्या. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत १ कोटी घरांवर सौरऊर्जा मशिन लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. यात ३०० युनिट वीजपुरवठा पुरविला जाईल. ही योजना अंमलात येणा-या घरातील आर्थिक स्थैर्य सुधारण्यास मदत होईल, लघुउद्योगांना चालना मिळेल. या नव्या योजनेच्या शुभारंभामुळे महेंद्र सोलराइजला आपल्या व्यवहाराच्या बळकटीकरणासाठी चालना मिळाली आहे.

आगामी वर्षाच्या सुरुवातीलाच महेंद्र सोलराइज अधिक संख्याबळ, साधनसामग्री यांसह बाजारपेठेत सुसज्ज असलेली पाहायला मिळेल. मागणी तसा पुरवठा व्हावा, याकरिता या सर्व सोईसुविधा उपलब्ध असतील. मशिनची गुणवत्ता कायम राखण्यास कोणतीही कसूर राहणार नाही, तसेच वेळेत सेवा पुरविली जाईल, याकडे कंपनीचा कटाक्ष असेल. नाशिक मागणीप्रमाणे पुरवठा दिल्यास देशपातळीवर कंपनीसौरऊर्जा बाजारपेठेत पहिल्या तीन क्रमांकांच्या स्थानात पोहोचेल, असा विश्वास कंपनीच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला.

सौरऊर्जा बाजारपेठेतील उलाढाल, तसेच आर्थिक विकासाच्या संधी पाहता, महेंद्र अँड महिंद्रा फार्म इक्विपमेंट विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित घरावरील सौरऊर्जा मशिन ही बाजारपेठेतील नव्या मागणीत अनेक विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, शिवाय वर्षभरात १५ ते २० टक्के आर्थिक विकास सहज शक्य होत आहे. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता, वेगाने वाढ होणेही अपेक्षित आहे. यामुळे नवनवी आव्हाने निर्माण होतील.


बाजारपेठेतील दांडगा अनुभव, वाढचे जाळे निर्माण करत महेंद्र सोलराइज आपल्या ब्रँडचे नाव टिकून राखणार. नाशिकतील बाजारपेठेत कंपनीचा विकास निश्चित आहे.’’ आपला मुद्दा मांडताना ते पुढे म्हणाले की, ग्राहकांमध्ये सौरऊर्जेच्या योग्य वापराबद्दलची जनजागृती वाढत आहे. येत्या २-३ वर्षांत सर्व स्तरांतून जनजागृतीवरील भर वाढलेला दिसून येईल. बाजारपेठेत उत्तम दर्जाच्या सेवा देणा-या कंपनीच केवळ ग्राहकांच्या अपेक्षेवर ख-या उतरतील. त्यांच्या व्यवसाय वृद्धिंगत
होईल. ग्राहकांचा विश्वास टिकविण्यासाठी महिंद्रा सोलराइज उत्तम दर्जाच्या सेवा, ग्राहककेंद्रित मागणी तसा पुरवठा यावर भर देत, वर्षभरात २० ते २५ टक्के आर्थिक विकास साधणार, हे निश्चित.’’

त्यांनी वीजपुरवठा कंपन्यांबद्दलही भाष्य केले. ‘’हा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, वाढीस याकरिता डिस्कॉमने परमिट प्रक्रिया सुरळीत करणे आणि व्यावसायिक आणि औद्योगिक (सी अँड आय) ग्राहकांसाठी नेट मीटरिंग आणि योग्य वापरासाठी अधिक कार्यक्षम प्रणाली निर्माण करणे गरजेचे आहे,’’ असे सांगत सिक्का यांनी देशात सौरऊर्जेच्या योग्य वापरासाठी घरावर बसवल्या जाणा-या सौरऊर्जा मशिनच्या वाढत्या मागणीत वीजपुरवठा करणा-या कंपनीबाबत आपली भूमिकाही जाहीर केली.
मेरकॉमच्या ताज्या अहवालानुसार, भारताची एकूण स्थापित सौरक्षमता १३ टक्के, तसेच ८७ गिगावॅट आहे. सौरऊर्जा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात भविष्यातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, जागरूकता वाढविणे महत्त्वाचे ठरले, तसेच येथील आव्हानांवर मात करण्यासाठी तत्पर राहणेही फार आवश्यक असल्याचे कंपनीच्या वतीने नमूद करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.