नाशिक : ख्यातनाम महिंद्रा अॅण्ड महिंद्राने आपल्या नवीन कार श्रेणीमध्ये एक्सयूव्ही३एक्सओ नवीन कार बाजारपेठेत सादर केली. नवीन कारमध्ये कंपनीने या सेंगमेेंटमध्ये सर्वोत्तम विशेष वैशिष्ट्य समाविष्ट केले आहेत, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली.
या नव्या कारचे बुकिंग १५ मे पासून सुरू होणार असून डिलिव्हरी २६ मे पासून देण्यात येण्यात आहे. कारची एक्स शो रुम किंमत ७.४९ लाखापासून असून ते १३.९९ लाख रुपये इतकी आहे. महिंद्राने एक्सयूव्ही ३एक्सओमध्ये सुरक्षेसाठी३५ सेफ्टी फीचर्स सर्वोत्तम सुरक्षेसाठी दिली आहेत. त्यामध्ये सहा एयरबॅग्स, चार डिस्क ब्रेक, मुलांच्या सुरक्षेसाठी पॅसेंजर एयरबॅग ऑन/ऑफ आदींसारखे वैशिष्टय प्रदान केली आहेत. पैनोरमिक सनरूफ वेरिएंट ची एक्स शोरूम किंमत ८.९९ लाख रुपये इतकी आहे. कंपनीने या गाडीमध्ये स्काय रुफ ही सुविधा दिली असून या सेंगमेंटमध्ये ही सुविधा देणारी ही पहिली एसयूव्ही आहे. यासह ६० डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टम ही देण्यात आली आहे. ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, ड्राइव व्हिडीओ रिकॉर्डिंग, इंटरॅक्टिव्ह पार्किंग गाइडन्सच्या ही सुविधा देण्यात आल्या आहेत. एक्सयूव्ही३एक्सओ गाडी एमएक्स, एएक्स,एएक्स३, एएक्स५, एएक्स७ यासह लक्झरी आणि प्रो पॅक वर्जनमध्ये पर्यायही देण्यात आला आहे.
@ नवीन कारची निर्मीती नाशिक प्रकल्पात झाली असून कंपनीने नवीन गाडीमध्ये अत्यंत चांगली वैशिष्ट्य दिली आहेत आम्हाला आशा आहे येत्या दोन ते तीन वर्षात एक्सयूव्ही३एक्सओ देशात नंबर एकची सर्वांधिक विक्री होणारी कार ठरणार आहे. सध्याला आम्ही महिन्याला ९ हजार कारची निर्मिती करत आहोत. ग्राहकांच्या प्रतिसादानंतर लवकरच यांची संख्या साडेदहा हजारांपर्यंत वाढवणार आहोत.
- नलिनकांत गोल्लागुंटा
मुख्य कार्यकारी अधिकारी
आटोमोटीव्ह डिव्हीजन,
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा