NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

महिंद्राने ‘द’ SUV लाँच केली: Thar ROXX

0

कोची : भारतातील आघाडीची SUV उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड अभिमानाने Thar ROXX – ‘THE’ SUV सादर करतेय, जी देशातील SUV चे आधीचे नियम पुन्हा नव्याने परिभाषित करते. ₹ 12.99 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीसह, थार ROXX महिंद्राची बेधडक वृत्ती आणि नेहमीपेक्षा वेगळे देण्याची भावना दर्शविते. सफाईदार ड्रायव्हिंग आणि शक्तिशाली तरीही सुरक्षित कामगिरी करण्यासाठी डिझाइन व तयार केलेले थार ROXX सर्व भूप्रदेश जिंकते, तसेच अनेक आलिशान वैशिष्ट्ये ऑफर करते.

महिंद्राच्या संपूर्णपणे नवीन M_GLYDE प्लॅटफॉर्मवर तयार केलेली थार ROXX अत्यंत सफाईदार हाताळणी आणि क्लास लीडिंग डायनॅमिक्ससह अपवादात्मक सुलभ व आलिशान राइड देते. महिंद्राची मूळ ओळख नवीन 2 रूपात समोर आणत जीवनातील प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम हवे असणाऱ्यांसाठी एक अत्यंत आलिशान, आरामदायी SUV अनुभव देते. थार ROXX ची विविध भूभाग आणि उंचीवरील अत्यंत कठीण परिस्थितींमध्ये कठोरपणे चाचणी केली गेली आहे, ज्यामध्ये थारच्या वाळवंटातील +50 डिग्री सेल्सिअस तापमानातील वाळूचे ढिगारे, उमलिंग ला येथील समुद्रसपाटीपासूनची उंचावर, कूर्गमधील चिखलाने भरलेला भाग आणि काझामध्ये -20 °से. तापमानातील गोठविणारी थंडी यांचा समावेश आहे. जे लोक मनापासून भारतीय आहेत, परंतु मानसिकता जागतिक आहे, अशा जागतिक भारतीयांसाठी थार ROXX ही एक मजबूत आणि विश्वासार्ह निवड आहे, याची हमी ही व्यापक चाचणी देते.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष श्री. वीजय नाकरा म्हणाले, “थार ब्रँडला नेहमीच एक सांस्कृतिक पाठबळ आहे, स्वातंत्र्य आणि समुदायाच्या मजबूत भावनेचे ते एक प्रतीक आहे. या वारशावर आधारित थार आरओएक्सएक्स ही ‘द’ एसयूव्ही आहे, ज्यामध्ये हेड-टर्निंग डिझाइन, एक सुसंस्कृत आणि सफाईदार ड्रायव्हिंग, शक्तिशाली कामगिरी, उत्कृष्ट ऑफ-रोडिंग क्षमता, सुरक्षेला प्राधान्य, आलिशान जागा आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. Thar ROXX सह, आम्ही फक्त SUV चा अनुभव वाढवत नाही, तर पुढील 3 ते 5 वर्षांत थार ब्रँडला नंबर 1 SUV (>12.5 लाख सेगमेंट) बनविण्याकडे लक्ष केंद्रित करत आहोत.”

Leave A Reply

Your email address will not be published.