वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन
o ड्युअल-टोन बंपरसह वैशिष्ट्यपूर्ण फ्रंट ग्रिल
o संपूर्ण नवीन ब्लॅक थीम डॅशबोर्ड व नवीन स्टीयरिंग व्हील
o टॅंगो रेड आणि बॅटलशिप ग्रे या दोन नवीन रंगांसह सहा रंग पर्याय
आराम आणि सोयीसुविधा
o स्लायडिंग आर्मरेस्ट आणि रियर एसी व्हेंटसह नवीन सेंटर कन्सोल
o डोअर-माउंटेड पॉवर विंडोज, आतून चालणारे फ्युएल लिड, डेड पेडल (AT)
o रियर वॉश अँड वायपर, ए-पिलर एंट्री असिस्ट हँडल, रियर व्ह्यू कॅमेरा
स्मार्ट टेक
o अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सह 26.03 से.मी. एचडी इन्फोटेन्मेंट स्क्रीन
o Type-C यूएसबी पोर्ट (फ्रंट & रियर), अॅडव्हेंचर स्टॅट्स Gen II
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील अग्रगण्य एसयूव्ही निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने 9.99 लाख रु. पासून सुरू होणारी नवीन थार आज सादर केली. नवीन डिझाईन घटक, प्रगत आरामदायी वैशिष्ट्ये आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी इंटिग्रेशनसह ही वैशिष्ट्यपूर्ण एसयूव्ही शहरी प्रवासाची नव्याने व्याख्या करणार असून कठीण वीकेंड अॅडव्हेंचर्सना आणखी उंचावेल.
अतुलनीय क्षमता आणि कालातीत डिझाईनमुळे, ‘थार’ ब्रँडने 3 लाखांहून अधिक उत्साही मालकांची समर्पित कम्युनिटी निर्माण केली आहे. फक्त एसयूव्ही न राहता, ती एक जीवनशैलीची ओळख ठरली असून पिढ्यान् पिढ्या साहस आणि नवनवीन गोष्टींचा ध्यास घेण्यासाठी प्रेरित करत आली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नलिनीकांत गोल्लागुंटा यांनी सांगितले, “गेल्या अनेक वर्षांत, थार फक्त एसयूव्ही राहिली नाही—ती स्वातंत्र्य, साहस आणि जीवनशैलीचे प्रतीक बनत आमच्या ग्राहकांशी खोलवर जोडलेली आहे. महिंद्रा मध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांचे ऐकतो आणि त्यांच्या गरजांनुसार बदल घडवतो, म्हणूनच नवीन थारमध्ये त्यांच्या फीडबॅकचे प्रतिबिंब तसेच त्यांना सर्वोत्तम देण्याची आमची वचनबद्धता दिसून येते. नवीन डिझाईन घटक, स्मार्ट तंत्रज्ञान, वाढीव आरामदायीपणा आणि सोयीसुविधांचे मिश्रण करून, नवीन थार एक अतुलनीय ड्रायव्हिंग अनुभव देते. त्यायोगे आमचे ग्राहक शहरी तसेच ऑफ-रोड दोन्ही वातावरणात अमर्याद शक्यता शोधण्यास सक्षम होतात.”
नवीन रूप
नवीन थारच्या बाह्य डिझाईनमध्ये विशिष्ट फ्रंट ग्रिल, ड्युअल-टोन फ्रंट बंपर आणि R18 अलॉय व्हील्स आहेत. त्यातून वाहनाला एक अनोखी ओळख मिळते. आतील भागात, नवीन ब्लॅक थीम डॅशबोर्ड व नवीन स्टीयरिंग व्हील अंतर्गत रचनेला अधिक सौंदर्यपूर्ण दृष्टीकोन देतात. टॅंगो रेड आणि बॅटलशिप ग्रे या दोन नवीन रंग पर्यायांसह नवीन थार सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
दैनंदिन आरामशीर अनुभव
आराम आणि सोयीसुविधांचा विचार करून डिझाईन केलेल्या नवीन थारमध्ये रियर एसी व्हेंटस आहेत. त्यामुळे मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना सुखकर प्रवास अनुभव मिळतो. स्लायडिंग आर्मरेस्ट आणि डेड पेडल (AT) चालकाला अतिरिक्त आराम मिळवून देतात. डोअर-माउंटेड पॉवर विंडोज आणि रियर-व्ह्यू कॅमेरा ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर करतात. आतल्या बाजूने चालणारे फ्युएल लिड रीफ्युएलिंगला त्रासमुक्त करते. रियर वॉश आणि वायपर खराब हवामानात दृश्यमानता टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच, ए-पिलर एंट्री असिस्ट हँडल सहजपणे आत येणे आणि बाहेर पडणे यासाठी अतिरिक्त आधार देते.
स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि वैशिष्ट्ये
नवीन थारमध्ये 26.03 से.मी. एचडी इन्फोटेन्मेंट स्क्रीन असून तो अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्ले दोन्हीला सपोर्ट करते तसेच Type-C यूएसबी पोर्ट्ससह येते. त्यातून तुमच्या स्मार्टफोनच्या फंक्शनॅलिटीचे सहज इंटिग्रेशन होते. टायर डायरेक्शन मॉनिटरिंग सिस्टम टायरच्या दिशेबाबत रिअल-टाइम माहिती देते. त्यामुळे सुरक्षितता वाढते. साहसवीरांसाठी असलेले अॅडव्हेंचर स्टॅट्स Gen II फीचर ऑफ-रोड डेटा जसे की रेसिंग टॅब, अल्टीमीटर, बाह्य तापमान आणि प्रेशर, ट्रिप मीटर आणि स्टीयरिंग डायरेक्शन पुरविते. त्यामुळे प्रवासात नवा अनुभव मिळतो आणि स्मार्ट व कनेक्टेड ड्रायव्हिंग शक्य होते. महिंद्रा विविध ड्रायव्हिंग प्राधान्यानुसार इंजिन पर्याय देते. त्यात RWD तसेच 4X4 कॉन्फिगरेशन्समध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशी एकापेक्षा जास्त ट्रान्समिशन्स उपलब्ध आहेत.
Comments are closed.