पुणे : युटिलिटी (विशिष्ट कामासाठी डिझाईन केलेली आणि कठीण रस्त्यांवर सहज प्रवास करू शकणारी) वाहने आणि ३.५ टनांपेक्षा कमी वजनाची एलसीव्ही वाहने बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने महिंद्रा वीरो बाजारपेठेत दाखल केल्याची घोषणा केली आहे, याची किंमत ७.९९ लाख रुपयांपासून पुढे आहे. ३.५ टनांपेक्षा कमी वजनाच्या एलसीव्ही वाहनांच्या सेगमेंटमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी डिझाईन केलेला वीरो श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज, त्यामुळे होणारी भरपूर बचत, दमदार इंजिन पर्यायांसह अतुलनीय कामगिरी, उद्योगक्षेत्रात सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये, वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी अधिक प्रगत सुरक्षा आणि केबिनमध्ये प्रीमियम अनुभव या सर्वांचा लाभ महिंद्रा वीरोमध्ये घेता
येणार आहे.
महिंद्राचा नाविन्यपूर्ण अर्बन प्रॉस्पर प्लॅटफॉर्म (युपीपी) भारतातील पहिला ग्राउंड-अप मल्टी-एनर्जी मॉड्युलर सीव्ही प्लॅटफॉर्म आहे. सुरक्षा नियमांचे पालन करण्याबरोबरीनेच त्याहीपेक्षा जास्त संरक्षण प्रदान करण्यासाठी तसेच वाहनावर कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये बचत व्हावी यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या महिंद्रा वीरोमध्ये अशा अनेक सोयीसुविधा आणि वैशिष्ट्ये आहेत ज्या अशा प्रकारच्या वाहनांमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध होत आहेत. १ ते २ टनांपेक्षा जास्त पेलोड घेता यावेत यादृष्टीने याचे इंजिनीयरिंग करण्यात आले आहे, डेक लांबीचे अनेक वेगवेगळे पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक असे वेगवेगळे पॉवरट्रेन पर्याय यामध्ये मिळतात.
महिंद्रा वीरोमध्ये अशा अनेक सोयीसुविधा आणि वैशिष्ट्ये आहेत ज्या अशा प्रकारच्या वाहनांमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध होत आहेत. ड्रायव्हर साईड एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, २६.०३ सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेन्ट सिस्टिम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि पॉवर विंडोज इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रकारच्या वाहनश्रेणीतील सर्वोत्तम म्हणावीत अशी वैशिष्ट्ये महिंद्रा वीरोमध्ये आहेत – १६०० किलोची पेलोड क्षमता, ३०३५ एमएम कार्गो लांबी, डिझेलसाठी १८.४ किमी/लिटर* मायलेज आणि ५.१ एम टर्निंग रेडियस यांच्यासह महिंद्रा वीरो एक अतिशय अष्टपैलू आणि शहरांतर्गत उपयोगासाठी आदर्श वाहन आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष – श्री वीजय नाक्रा म्हणाले, “महिंद्रा वीरो ३.५ टनांपेक्षा कमी वजनाच्या एलसीव्ही वाहनांच्या सेगमेंटमध्ये आमचे नेतृत्वस्थान अधिक बळकट करेल. आमच्या ग्राहकांना अधिकाधिक नफा मिळवता यावा यासाठी आम्ही याची रचना केली आहे, त्यासाठी यामध्ये श्रेणीतील सर्वोत्तम पेलोड, दमदार मायलेज आणि सर्वोत्कृष्ट मॅन्युव्हरेबिलिटी यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या वाहन प्रकारामध्ये पहिल्यांदाच सादर करण्यात येत असलेले तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये वीरो मध्ये असल्याने याच्या केबिनमध्ये प्रीमियम अनुभव घेता येतो, अतुलनीय सुरक्षा, कामगिरी आणि क्षमता यांचे लाभ मिळतात. महिंद्रा वीरो त्याच्या विभागामध्ये क्रांती घडवून आणेल, या प्रकारच्या सर्व गाड्यांमध्ये महिंद्रा वीरो आघाडीवर राहील. ‘सोच से आगे’ हे वचन महिंद्रा वीरो खऱ्या अर्थाने पूर्ण करेल.”