मुंबई : इकोफाय या भारतातील हरित परिवर्तनाकरिता वित्तपुरवठा करण्याप्रती कटिबद्ध एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ असलेल्या ग्रीन-ओन्ली एनबीएफसीने आज महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम)ची उपकंपनी महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) सोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली. हा सहयोग भारतात इलेक्ट्रिक तीन-चाकींच्या अवलंबतेला गती देण्याची अपेक्षा आहे. एमएलएमएमएल ही भारतातील पहिल्या क्रमांकाची* इलेक्ट्रिक तीन-चाकी उत्पादक कंपनी आहे आणि इलेक्ट्रिक तीन-चाकींची व्यापक श्रेणी देते. या सहयोगाचा महिंद्राचे इलेक्ट्रिक वेईकल उत्पादनामधील
कौशल्य आणि इकोफायच्या नाविन्यपूर्ण फायनान्सिंग सोल्यूशन्सना एकत्र करत वाढत्या ईव्ही तीन-चाकी मागणीची पूर्तता करण्याचा मनसुबा आहे.
एमएलएमएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुमारी सुमन मिश्रा म्हणाल्या, ”आमचा सहयोग भारतात इलेक्ट्रिक तीन-चाकींच्या अवलंबतेला गती देण्याच्या दिशेने मोठा पुढाकार आहे. हा सहयोग ग्राहकांना सर्वोत्तम फायनान्स सोल्यूशन्स देईल आणि त्यांना त्यांच्या सूक्ष्म-उद्योजकीय प्रवासामध्ये साह्य करतो. इकोफायसोबत सहयोगाने आम्ही हरित गतीशीलता सर्वांसाठी उपलब्ध व किफायतशीर करून देण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
याप्रसंगी मत व्यक्त करत इकोफायच्या सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजश्री नाम्बियार म्हणाल्या, ”महिंद्रा एलएमएमएलसोबतचा हा सहयोग शाश्वत परिवहन सोल्यूशन्सना चालना देण्याच्या आमच्या मिशनशी संलग्न आहे. सहयोगाने, आम्ही इलेक्ट्रिक तीन-चाकींच्या अवलंबतेला गती देऊ, ज्यामुळे २०३० पर्यंत भारताच्या ३० टक्के ईव्ही अवलंबन संपादित करण्याच्या लक्ष्याप्रती योगदान देता येईल. हा सहयोग दोन्ही कंपन्यांना मोठे फायदे देतो. या सहयोगाच्या माध्यमातून इकोफाय आता उद्योगातील ८५ टक्के मागणीची पूर्तता करते आणि फायनान्सिंग, लीजिंग व सबस्क्रिप्शन मॉडेल्स देत आहे.”
२०२० मध्ये जवळपास ६७७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्य असलेल्या इलेक्ट्रिक तीन-चाकींसाठी जागतिक बाजारपेठ २०२१ ते २०२७ पर्यंत जवळपास १० टक्के सीएजीआर दराने विकसित होण्याची अपेक्षा आहे. प्रबळ सरकारी इन्सेंटिव्ह्ज आणि सबसिडीज इलेक्ट्रिक गतीशीलतेला चालना देत असताना हा सहयोग भारतातील परिवहन उद्योगासाठी हरित, अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगतीचे प्रतीक आहे.