मुंबई : महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) या भारतातील आघाडीच्या व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादक कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ मधे बाजारपेठेवरील वर्चस्व सलग चौथ्यांदा सिद्ध केले आहे. ट्रिओ आणि झोर ग्रँड या प्रमुख ब्रँडसह एमएलएमएमएलने एल5 विभागात इलेक्ट्रिफिकेशन आणत या क्षेत्रात ईव्ही प्रचलित करण्यात २४.२ टक्के वाटा उचलला आहे. आर्थिक वर्ष २४ मधील १६.९ टक्क्यांवरून यंदा त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. महत्त्वाचे ब्रँड व नव्या कंपन्यां प्रवेश होऊनही एमएलएमएमएलने एल5 बाजारपेठेत तब्बल ३७.३ टक्के हिस्सा मिळवला आहे.
कंपनीने पुढील लक्षणीय टप्पे साध्य केले –
- दोन लाख कमर्शियल ईव्हीजची विक्री करणारी पहिली कंपनी.
- ट्रिओ या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या इलेक्ट्रिक ऑटोच्या १ लाख युनिट्सची विक्री
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एमएलएमएमएलने ट्रिओ मेटल बॉडीमध्ये लाँच करत तसेच महिंद्रा झिओ ही पहिली इलेक्ट्रिक
फोर व्हीलर एससीव्ही लाँच करत आपल्या उत्पादन श्रेणीचा विस्तार केला. महिंद्रा झिओने उत्पादनश्रेणीतील इतर थ्री
व्हीलरप्रमाणे फोर व्हीलर कार्गो इलेक्ट्रिफिकेशन प्रवास सुरू केला आहे.