मुंबई,: महिंद्रा अँड महिंद्रा लि. या भारताच्या आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने त्यांच्या स्कॉर्पियो- एन Z8 श्रेणीमध्ये नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करत या गाडीचा एकंदर अनुभव उंचावण्याची बांधिलकी जपली आहे. ही नवी वैशिष्ट्ये ग्राहकांना जास्त आराम, सुरक्षा आणि सोयीस्करपणा देण्याच्या हेतूने समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटो डिमिंग आयआरव्हीएम आणि वायरलेस चार्जर (अॅक्टिव्ह कुलिंगसह) यांचा समावेश आहे. त्याशिवाय मिडनाइट ब्लॅक कलरचा पर्याय आता संपूर्ण Z8 प्रीमियम श्रेणीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
स्कॉर्पियो- एन Z8 श्रेणीमध्ये नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केल्याने एसयूव्ही बाजारपेठेतील महिंद्राचे स्थान बळकट झाले आहे. दर्जेदार वैशिष्ट्यांनी युक्त आणि वैविध्यपूर्ण एसयूव्ही उपलब्ध करत ग्राहक समाधान व मूल्याला प्राधान्य देणारी कंपनी म्हणून महिंद्रा आघाडीवर आहे.
स्कॉर्पियो- एनविषयी
स्कॉर्पियो- एन तिचे आकर्षक डिझाइन, दर्जेदार रायडिंग आणि हाताळणी, थरारक कामगिरी, आधुनिकतंत्रज्ञान आणि कोणत्याही प्रकारच्या प्रदेशावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता यासह या विभागातली समीकरणे बदलवण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. महिंद्राच्या आधुनिक बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली ही गाडी दणकट बांधणी, ऑफ- रोडिंगची क्षमता आणि रस्त्यावर जबरदस्त पकड देणारी आहे. स्कॉर्पियो- एनमध्ये टीजीडीआय एमस्टॅलिन (पेट्रोल) इंजिन बसवण्यात आले आहे, जे २०० पीएस आणि ३८० एनएम टॉर्क देते. त्याचप्रमाणे एमहॉक (डिझेल) इंजिन १७५
पीएस आणि ४०० एनएम टॉर्कसह सहा स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायी 4X4 यंत्रणेसह उपलब्ध करण्यात आले आहे.
स्कॉर्पियो- एनची अंतर्गत सजावट आकर्षक असून अभिजात कॉफी- ब्लॅक लेदर अपहोल्स्ट्री, सर्वोत्तम कमांड सीटिंग पोझिशन, दमदार मेटल फिनिश्ड ड्युएल रेल्समध्ये बसवण्यात आलेले सेंटर कन्सोल, आधुनिक इन्फोटेनमेंट यंत्रणा आणि इतर विविध सुविधा त्यात देण्यात आल्या हेत. स्कॉर्पियो-
2
एनमध्ये अड्रेनॉक्स इंटेलिजन्स, ७० पेक्षा जास्त कनेक्टेड कार सुविधा, बिल्ट- इन अलेक्सा आणि सोनीची थ्रीडी इमर्सिव्ह साउंड सिस्टीम व हे सर्व वापरण्यासाठी २०.३२ सेमी इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे.