NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

महिंद्रातर्फे महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी एआय अनेबल्ड प्रोग्रॅमची अमलबजावणी

0

अहमदनगर : महिंद्रा अँड महिंद्रा ही ऊस पिकातील साखरेच्या अंशाचे प्रमाण जाणून घेत त्यानुसार काढणीसाठी एआय अनेबल्ड ऊसतोडणी प्रोग्रॅम उपलब्ध करून देणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे एसएसके लिमिटेड (पूर्वीचे संजीवनी शुगर्स) अहमदनगर, महाराष्ट्र येथे एआय- अनेबल्ड ऊस तोडणी प्रोग्रॅम उपलब्ध करून दिला.

२०२४ च्या गाळप हंगामादरम्यान सहकार महर्षी शंकरराव कोल्हेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या संपूर्ण ऊस पिकासाठी वापरण्यात आलेल्या या प्रोग्रॅमअंतर्गत साखरेच्या प्रमाणाचे अचूक विश्लेषण योग्य वेळेत ऊसाची तोडणी करण्यात आली.
या नव्या प्रोग्रॅमविषयी महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या शेती उपकरण विभागाचे अध्यक्ष श्री. हेमंत सिक्का म्हणाले, ‘शेतीसाठी आर्टिफिशियल इंटिलेजन्सचा वापर लाभदायक ठरू शकतो. आम्ही साखर उद्योगासारख्या शेती क्षेत्रातील अग्रेसर संस्थात्मक क्षेत्रासाठी अशाप्रकारचे शुगरकेन अनालिटिक्स टुल तयार केले आहे. ऊस पिकासाठी एआय प्रोग्रॅम वापरल्याने जमिनीच्या मोठ्या पट्ट्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते व त्यामुळे चांगले निष्कर्ष मिळवण्यास उदा. जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ऊस तोडणीचा योग्य वेळ ठरवणे, शुगर रिकव्हरी यासारखे निर्णय जास्त प्रभावीपणे घेता येतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने महिंद्रा शेतीकामाचे स्वरूप आमूलाग्र बदलण्याचे ध्येय ठेवले असून एसएसकेबरोबर भागिदारी केल्याचा आम्हाला आनंद वाटतो.’

कोल्हे शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष श्री. विवेक कोल्हे तंत्रज्ञानाचा परिणाम स्पष्ट करत म्हणाले, ‘कापणीसाठी एआयवर आधारित सुविधा राबवणारा भारतातील आमचा पहिलाच कारखाना आहे. तीन वर्षांपूर्वी ३००० एकर जागेवर प्रायोगिक प्रकल्प राबवल्यानंतर साखर रिकव्हरीसाठी आम्हाला त्याचा सातत्यपूर्ण फायदा झाला. आम्ही या वर्षी महिंद्राच्या सेवा परत घेण्याचे ठरवले असून कारखान्याच्या संपूर्ण जागेत त्यांचा हा प्रोग्रॅम राबवला जाणार आहे. या क्रांतीकारी तंत्रज्ञानामध्ये भारताच्या साखर कारखान्यांना तसेच भारतीय शेतकऱ्यांना दीर्घकाळ फायदा मिळवून देण्याची क्षमता आहे.’ 

ऊसतोडणी क्षेत्रात क्रांती आणण्याच्या उद्देशाने महिंद्रा गेल्या चार वर्षांपासन विविध साखर कारखान्यांसह काम करत असून भारतात एआय- अनेबल्ड कापणी करणारी पहिली कंपनी ठरली आहे. महिंद्राने स्पेक्ट्रोमेट्रीच्या मदतीने शेतीच्या अचूक आणि दर्जेदार पद्धती तसेच सॅटेलाइट इमेजिंग वापरून ऊसाच्या पिकातील साखरेचे अचूक प्रमाण ठरवते. एआय अल्गोरिदमद्वारे पिकाच्या पानातील फोटोसिंथेसिस घटकांचे विश्लेषण केले जाते व त्यावर पिक तयार होण्याचे स्तर ओळखले जातात व त्यानुसार शेतकऱ्याला सर्वाधिक उत्पन्न कधी मिळेल याचा विचार करून तोडणीसाठी योग्य वेळ ठरवली जाते.
भारत हा साखरेचा सर्वात मोठा निर्माता देश असून ऊस हे भारतातील प्रमुख नगदी पिक आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये ऊसाचे उत्पादन घेतले जाते व त्याचा देशाच्या शेती जीडीपीमध्ये (देशांतर्गत एकूण उत्पन्न) महत्त्वाचा वाटा आहे. ते खाद्यपदार्थ, फायबर, चारा, इंधन आणि रसायनांचा महत्त्वाचा घटक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.