मुंबई : चेन्नई येथे २६ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या ‘अनलिमिट इंडिया वर्ल्ड प्रीमियर’मध्ये महिंद्रातर्फे इलेक्ट्रिक ओरिजिन ‘इन्ग्लो आर्किटेक्चर’वर एक्सईव्ही आणि बी हे दोन अग्रगण्य इलेक्ट्रिक ब्रँड्स सादर करण्यात येणार आहेत. या दोन्ही ब्रँड्सच्या माध्यमातून त्यांची पहिली फ्लॅगशिप उत्पादने – एक्सईव्ही ९-ई आणि ‘बी ई ६-ई’सादर होतील.
इन्ग्लो आर्किटेक्चर हे भारतीय तत्त्वांनुसार आणि जागतिक दृष्टीकोनातून तयार केले गेले आहे. यामध्ये स्मार्ट आणि आकर्षक नवकल्पनांचा समावेश आहे. हे आर्किटेक्चर उत्कृष्ट सुरक्षितता, सर्वोत्तम कार्यप्रदर्शन आणि कार्यक्षमता प्रदान करते. चालकांना वाहन चालविण्याचा समृद्ध अनुभव प्रदान करणे हा इन्ग्लो निर्मितीचा उद्देश आहे.
एक्सईव्ही ९-ई हा ब्रॅंड इलेक्ट्रिक लक्झरीची परिभाषा व्यक्त करेल, तर ‘बी ई ६-ई’हा ब्रॅंड धाडसी व अॅथलेटिक कामगिरी देईल. हे दोन्ही भारतीय आयकॉन्स अतुलनीय डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अविस्मरणीय कामगिरी यांच्या माध्यमातून जगभरातील प्रत्येक ब्रॅंडला मात देण्यासाठी सज्ज आहेत.
या वाहनांचा पहिला टीझर पाहण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/J0NZYDoZArA
अधिक माहितीसाठी, https://www.mahindraelectricsuv.com/ ही वेबसाईट पाहा किंवा सादरीकरणाच्या कार्यक्रमापर्यंतच्या अपडेट्ससाठी आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा.