NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

राज्यातील नागरिकांना ५ लाखांचे आरोग्य कवच; अशी आहे तरतूद..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

राज्य शासनाने बुधवारी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत या योजनेचे केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेशी एकत्रीकरण करत आरोग्य कवच दीड लाखांवरून थेट पाच लाख रुपये करण्याचे ठरवले आहे. परिणामी, राज्यातील प्रत्येत कुटुंब म्हणजेच साधारण 12 कोटी नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. 

राज्य शासनाकडून महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्व अधिवास प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका धारक नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे. थोडक्यात केशरी आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांपुरता सीमित असणारी ही योजना आता सरसकट इतरही  नागरिकांना लागू होणार आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 इतक्या उपचारांचा समावेश आहे. परिणामी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या एकत्र येण्यानं दोन्ही योजनांमध्ये असणाऱ्या सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. 

योजना लाभासाठी काय करावे लागणार ?

– योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील जवळच्या नागरिकांनी शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. 
– ग्रामीण भागातील नागरिकांनी शासकीय आरोग्य शिबिरांमध्ये जाऊन आजाराची तपासणी करावी. 
– आजाराची खात्री झाल्यानंतर रुग्णाच्या रोगाची आणि खर्चाची माहिती आरोग्य मित्रांना दिली जाईल. 
– चोवीस तासांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होऊन उपचार सुरु होतात.

असे आहेत निकष..

– सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती महाराष्ट्राचा नागरिक असणे गरजेचे आहे.  
– नागरिकांकडे अधिवास प्रमाणपत्र, शिधापत्रिका असावी. 
– राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधील कोणत्याही रंगाची शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना योजनेचा लाभ घेता येईल. 
– योजनेसंदर्भातील सर्वाधिक माहितीसाठी https://www.jeevandayee.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या 
– तिथं Login पर्याय निवडा, ज्यानंतर एक नवा फॉर्म तुमच्यासमोर येईल. 
– तिथं आवश्यक माहिती आणि स्कॅन करत कागदपत्रांची पूर्तता करा. 
– पुढे सबमिट या बटणावर क्लिक करा. अशा रितीने तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करण्याचा टप्पा पार करत योजनेचा लाभ मिळवू शकता. 

या योजनेसाठी काही प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता केली जाणं महत्त्वाचं. त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, सरकारी डॉक्टरांकडून मिळालेले आजाराचे प्रमाणपत्र, वयाचं प्रमाणपत्र, अर्जदाराचे पासपोर्टसाईज 3 फोटो, उत्पन्नाचा दाखला यांचा समावेश आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.