NGN News
Latest Marathi News

महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला.. दिव्या देशमुख वूमन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियन !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

 महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला आहे. दिव्या देशमुख वूमन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. दिव्याने फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हंपी हिचा पराभव करत हा कारनामा केला आहे. दिव्या यासह वूमन्स चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. दिव्याआधी कोणत्याही भारतीय महिलेला अशी कामगिरी करता आली नव्हती. दिव्याच्या या विजयानंतर तिचे सोशल मीडियावर सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये दोन्ही कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारताच्या लेकी होत्या. त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार हे निश्चित होते. मात्र दोघीपैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार? याची उत्सूकता होती. मात्र दिव्याने चाली करत कोनेरुला पराभवाची धुळ चारली. विजय मिळवताच दिव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला कोनेरु हंपीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दिव्या आणि कोनेरु यांच्यातील अंतिम फेरीतील 2 सामने बरोबरीत राहिले.

Comments are closed.