NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक, सव्वा लाख रोजगार निर्मिती..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

महाराष्ट्रात एकूण 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे.राज्यातील उद्योगधंदे बाहेर गेल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला जात होता. दरम्यान या घोषणेने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये पुणे आणि औरंगाबाद येथे देशातील पहिल्या सुमारे १२ हजार ४८२ कोटीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. नवी मुंबईच्या महापे येथे होणाऱ्या जेम्स अॅण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.