NGN News
Latest Marathi News

मेनरोडच्या गणपती मंदिरात १९ ते २३ जानेवारी माघी गणेश जन्मोत्सव

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

मेनरोड येथील गणपती मंदिरात १३५ वा माघी गणेश जन्मोत्सव दि. १९ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत विशेष संगीत समारोहाचे आयोजन केले आहे.

उत्सवाचा प्रारंभ  सोमवार , दि. १९ जानेवारी  रोजी रात्री ९ ३० वा मंदिराची १०० वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या दर गुरुवारी होणाऱ्या श्री गणेश भक्त संगीत सेवेने होईल.

मंगळवार , दि. २० जानेवारी रोजी रात्री ९ ३० वा नाशिकचे युवा तबलावादक संगीत कुलकर्णी यांच्या स्वतंत्र तबलावादनाची   मैफिल होईल त्यांना अभिजित भाटजीरे संवादिनी साथ करतील.

बुधवार  दि. २१ जानेवारी रोजी सायं  ७ वा पं. प्रभाकर श्रीकृष्णशास्त्री गोडशे आणि ब्रह्मवृंद वेदोक्त मंत्रजागर करतील .

गुरुवार , दि. २२जानेवारी  रोजी  सकाळी ८ वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठण होईल. याच दिवशी सकाळी सकाळी ११ वा  ह .भ.प. सौ. रेणू रामदासी -कुलकर्णी यांचे श्रीगणेश जन्माचे कीर्तन होईल . त्यांना मयुरेश देशपांडे (तबला) आणि योगेश जाधव (संवादिनी) साथ करतील.   त्यानंतर  दुपारी १२ ३० वा श्री जन्मसोहळा  साजरा केला जाईल.

उत्सवाची सांगता शुक्रवार दि  २३ जानेवारी रोजी रात्री ९ ३० वा  नाशिकचे ज्येष्ठ गायक डॉ. अविराज तायडे यांच्या  गायनाने होईल. त्यांना पं .नितीन पवार  (तबला) आणि सुश्री शुभांगी भावसार  (संवादिनी) साथ करतील.   संपूर्ण उत्सव हा सर्वांसाठी खुला असून नाशिककर भाविक आणि संगीत प्रेमींनी कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

Comments are closed.