NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार बाळासाहेब थोरात यांना जाहीर

0

मनमाड/एनजीएन नेटवर्क

स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक शेती, सहकार चळवळ, कामगार क्षेत्र आदी संदर्भात उपक्रम राबविले जातात. त्याचाह एक भाग म्हणून कॉम्रेड माधवराव गायकवाड 5 व्या स्मृती जीवनगौरव पुरस्कारसाठी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (संगमनेर) निवड केली आहे. रोख रक्कम 51हजार रुपये. स्मृती चिन्ह, गौरवपत्र ,शाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . सदर पुरस्कार वितरण नोव्हेंबर महिन्यात कर्मभूमीत संगमनेर येथे कॉ. माधवराव गायकवाड बाबूजी स्मृती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा साधना गायकवाड आणि सचिव कॉ. राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत, खंडकरी शेतकरी प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रातही छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष होते. 25 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेच्या 8 शाखा कार्यरत आहेत. हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना घरे मिळालेत आहेत, नांदगाव विधानसभेचे आमदार, 6 वर्ष विधांपरिषेद , विरोधी पक्षनेते, भाकप चे12 वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे 15 वर्ष अद्यक्ष पद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन, आदी चळवळीत 75 वर्ष योगदान दिले आहे.

याआधी हा पुरस्कार खा. राजू शेट्टी, कॉ. एम ए पाटील, कॉ. मोहन शर्मा, कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. सू कुमार दामले यांना देण्यात आला आहे. याप्रसंगी विश्वस्त भास्कर शिंदे, दामू अण्णा पाटील, श्याम गरुड, व्ही डी धनवटे, सुभाष बेदमुथा, शबूशेट शिरसाठ, दत्तू तुपे, रिकब जैन, निखिल स्वर्गे, डॉ रामदास भोंग, देविदास भोपळे , साहेबराव गंभीरे किरण डावखर आदी उपस्थित होते.


यंदा जयंती शताब्दी महोत्सव वर्ष

कॉ. माधवराव गायकवाड जयंती शताब्दी महोत्सव वर्ष १८ जुलै ते १८ जुलै २०२४ राज्यभर साजरे केले जाणार आहे. या निमीत्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शेतकरी चळवळ, सहकार, क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव ग्रंथ संपादित करण्यात येणार, विवीध विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात करण्यात आहेत. महाराष्ट्र राज्य चे पहिले विरोधी पक्षनेते विधान परिषद होते. त्यांचे येथोचीत स्मारक मनमाड येथे महाराष्ट्र शासन ने उभारावे पूर्णाकृती पुतळा बसवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.