NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

लव्ह जिहाद ! मदरशामध्ये अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरातून निकाह

0

नगर/एनजीएन नेटवर्क

जिल्ह्यामध्ये लव्ह जिहादची एक धक्कादायक घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील खडकीमधल्या मदरशामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आले, तसेच घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे तरुणी धास्तावली यानंतर तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख खालेल्या इंदूरच्या तरुणाने मुलीला जाळ्यात ओढले. हिंदू धर्मापेक्षा मुस्लीम धर्म कसा चांगला आहे, हे बिंबवण्यात आले. धर्मांतर करून मुलीसोबत इंदूरमध्ये निकाहही करण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपी सायाम कुरेशी याच्यासह चार आरोपींना गजाआड करण्यात आले. इंदूरमधील दोन आणि कोपरगावमधील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी या मुलीची सुटका केली आहे. कोपरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.