NGN News
Latest Marathi News

‘सावाना’ तर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

सार्वजनिक वाचनालय, नाशिक ( सावाना ) च्या वतीने लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या निलिमा साठे – शिंदे व नाशिक आय.टी. आय.चे उपप्राचार्य मा. रामदास पगारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्त्या निलिमा साठे – शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य जगभर पोहचलेले आहे. जगातील बऱ्याच शैक्षणिक संस्थानमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तसेच प्रकाशबीजे या कवितेतील प्रसिध्द कडवे आम्ही प्रकाश दिवे रुजवित चाललो, वाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो या ओळींनी मला सामजिक कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते असे मत व्यक्त केले. सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ‘सावाना’चे उपाध्यक्ष वैद्य. विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सहा. सचिव प्रा. सोमनाथ मुठाळ, ग्रंथसचिव देवदत्त जोशी आदी उपस्थित होते.

Comments are closed.