NGN News
Latest Marathi News

८७ दिवस ३८०० किमी पायी प्रवास करून लोहोणेरचे वारकरी परतले

  • नर्मदा परिक्रमा पूर्ण; ग्रामस्थांकडून सवाद्य मिरवणूकीसह भव्य स्वागत

** पंडित पाठक

लोहोणेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या तीन महिन्यां पूर्वी नर्मदा नदी पायी परिक्रमा साठी गेलेले लोहोणेर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य धोंडू धर्मा आहिरे, भिका सुपडू आहिरे व सौ.आशाबाई सुधाकर आहिरे हे वारकरी लोहोणेर येथे परतल्यानंतर त्यांचे लोहोणेर येथे भव्य स्वागत करण्यात आले.

गेल्या २९ सप्टेंबर रोजी धोंडू आहिरे, भिका आहिरे व सौ. आशाबाई आहिरे यांनी नर्मदा नदी पायी परिक्रमा करण्यासाठी लोहोणेर येथून प्रस्थान गेल्या केले होते. एकूण ८७ दिवसांचा प्रवास करीत अत्यंत खडतर व आवाहत्मक असा सुमारे ३८०० किलोमीटरचा पायी चालत प्रवास केला. सुमारे तीन महिन्यां नंतर २४ डिसेंबर रोजी या नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांचे लोहोणेर येथे आगमन झाले. नंतर त्यांचे लोहोणेर येथे भव्य स्वागत करण्यात आले. या लोहोणेर येथील नर्मदा परिक्रमा भाविकां समावेत कृष्णा तात्या( तळवाडे),पोपट दशरथ सोनवणे (दसाने), प्रभाकर दौलत भामरे (पिंपळकोठे), अर्जुन उत्तम जाधव (दसाने), व सुनील सुभाष ठाकरे (भऊर)या यात्रेकरू भाविकां समवेत यांनी एकत्रित रित्या ही पायी परिक्रमा पूर्ण केली. यावेळी या यात्रेकरूची लोहोणेर गावांतून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर वरून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी येथील पुरातन बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत प.पु. पवनदासजी महाराज, देवदारेश्वर येथील महंत प.पु. गणेशपुरीजी महाराज (पिंपळगाव) हभप भाईदासजी महाराज (शनिमाडळ)कमळदास महाराज लोहोणेर, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महंत पावनदासजी महाराज व महंत गणेश पुरीजी महाराज व कृष्णा तात्या यांनी आपले मनोगत व्यक्त करीत नर्मदा नदी पायी चालत परिक्रमा पूर्ण करण्यासाठी आपले भाग्य लागतो. नर्मदा फेरी पूर्ण करणे म्हणजे आपण नर्मदा मातेच्या सानिध्यात येतो. यामुळे धार्मिक वृत्ती कडे आपला कल वाढतो पूर्व पुण्य गाठीशी असल्यानेच ही परिक्रमा पूर्ण होते. सर्वसामान्य व्यक्तीने जीवनात एकदा तरी या नर्मदा नदी पायी परिक्रमेचा लाभ घ्यावा म्हणजे आपले जीवन सार्थकी लागेल असे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार वाडा मित्र मंडळ, प्रसाद देशमुख व समस्त आहिरे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना पाठक यांनी केले. याप्रसंगी महिला व ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर कुमारिका पूजन व महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते तर या निमित्ताने रात्री भागवत कथाकार हभप प्रकाश महाराज शास्त्री दोंडाईचा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Comments are closed.