संचालक सुनील महामुनी यांचा पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते गौरव
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्य शासनाच्या छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरण अर्थात ‘सीएसएमआरडीए’च्या आवश्यक लोगोसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत नाशिकमधील माँ ऍडव्हरटाईझिंग चे संचालक सुनील महामुनी यांनी तयार केलेल्या लोगोला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सदर लोगोचे अनावरण करण्यात आले. पुरस्काराची घोषणा मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येवून महामुनी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त जी. श्रीकांत, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यातील अनेक स्पर्धक सहभागी झाले. दरम्यान, या यशाबद्दल सुनील महामुनी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comments are closed.