NGN News
Latest Marathi News

इगतपुरी चित्रनगरीत स्थानिक कलाकारांना संधी हवी : ‘नरेडको’द्वारा मागणी

  • शिष्टमंडळाची मंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

इगतपुरीजवळ साकारल्या जाणाऱ्या प्रस्तावित चित्रनगरीत स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी ‘नरेडको’ शिष्टमंडळाने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय, ओझर विमानतळ परिसरात तातडीने पार्किंग हब निर्माण करण्याबाबतही भुजबळ यांना साकडे घालण्यात आले.

मंत्री भुजबळ यांच्या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये चित्रनगरीत स्थानिक कलाकारांना संधी मिळणे, पार्किंग हब, इंधन पुरवठा सेवा, संबंधित औद्योगिक उपक्रम आदींचा समावेश होता. भुजबळ यांनी या मुद्द्यांबाबत सकारात्मकता दर्शवल्याचे सांगण्यात आले. शिष्टमंडळात ‘नरेडको’ अध्यक्ष सुनील गवादे, सचिव शंतनू देशपांडे, उपाध्यक्ष उदय शाह, ज्येष्ठ सदस्य जयेश ठक्कर, ताराचंद गुप्ता, प्रशांत पाटील, अभय नेरकर, प्रसन्न सायखेडकर, अश्विन आव्हाड, आकाश कापडणे, शशांक देशपांडे, भाविक ठक्कर, नितीन सोनवणे आदींचा सहभाग राहिला.

@ इगतपुरी चित्रनगरी प्रकल्पामुळे नाशिक परिसरातील पर्यटन, चित्रपट उद्योग आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. या प्रकल्पासाठी शासन स्तरावर आवश्यक त्या प्रक्रिया जलद गतीने सुरु असून लवकरच त्याला मूर्त स्वरूप लाभेल.

छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

Comments are closed.