NGN News
Latest Marathi News

जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी घेतली कर्जमुक्त झाल्याची घोषणा

कर्जदारांनी आत्महत्या करणार नाहीं नये अशी घेतली शपथ

येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रतिकात्मक “कर्जमुक्त” झाल्याची घोषणा करत आत्महत्या न करण्याची शपथ घेतली. भारताच्या राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून झालेल्या या सोहळ्यात येवला, नांदगाव व निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमात नांदगाव तालुक्यातील भाऊसिंग ठोके, दीपक सोळुंके, एकनाथ ठोके, हरिश्चंद्र सोळुंखे, तसेच येवला तालुक्यातील भास्कर कदम, साहेबराव पगारे, पुंडलिक चव्हाण, गोविंद पवार, सुरेश भगत, रंजना कांदळकर, विलास काळे, रतन कांदळकर, किरण कांदळकर, संपत उशीर, विजय पठाडे, वाल्मीक मगर, सतीश ठोंबरे, नाना बोंबले, नवनाथ निकम, माधव बोंबले, चांगदेव कदम, आनंदा महाले, पांडुरंग शेलार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी “कर्ज परतफेड न करण्याची व आत्महत्या न करण्याची ” शपथ घेतली. यावेळी जिल्हा बँकेच्या जाचामुळे आत्महत्या केलेल्या पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी शैलेश झुटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमास शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, जेष्ठ शेतकरी नेते मोतीराम पानगव्हाणे, शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, संतु पाटील झांबरे, अनिस पटेल, सूर्यभान झांबरे, दगु साठे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, वसंतराव झांबरे, अशोक भोरकडे, गणेश लोहकरे, मच्छिंद्र जाधव, सचिन शेवाळे, शंकर गायके, प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, रयत क्रांती संघटनेचे वाल्मिक सांगळे, नवनाथ वैद्य, संजय तासकर, येवला युवक क्रांती संघटनेचे विजयकांत पठाडे, वाल्मिकराव मगर तसेच भाजप पदाधिकारी राहुल लोणारी, शिवसेना पदाधिकारी दीपक भदाणे उपस्थित होते.

या प्रतिकात्मक कर्जमुक्ती घोषणेद्वारे शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबवून नव्या उत्साहाने शेती करण्याचा निर्धार व्यक्त केला.

#

एक नोट बळीराजासाठी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

#

शेतकरी करमुक्ती अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी थकीत शेतकऱ्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी “फक्त 10 रुपयांची एक नोट बळीराजासाठी” अशी सामाजिक आवाहन केली होती. या आवाहनाला व्यापारी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आर्थिक मदत केली.

त्यात राहुल लोणारी, दीपक भदाणे, योगेश सोनवणे, देविदास झिंजुर्डे, मनोहर गायकवाड, ज्ञानेश्वर खैरमोडे, मुकेश चावळे, प्रसाद खांबेकर, डॉ. गोविंद भोरकडे, अतुल घाटे, अमित अंकाईकर, शरद काळे, संजय शिंदे, सचिन शिंदे, दत्तू जेजुरकर, नितीन पिंपळे, सागर पडवळ, रत्नाकर चकोर, योगेंद्र वाघ, सुनील गायकवाड, अविनाश पाटील, राजेंद्र शेलार, एकनाथ भालेराव यांचा समावेश होता.


“13 लाखाच्या कर्जाची 48 लाख रुपये मागणी आहे. माझे वडील मयत झाले आहे. वारसदार म्हणून मी रुपया भरणार नाही. सरकसकट माफ करावे. जमिनीचा ताबा सोडणार नाही…
चंद्रशिंग राजपूत, बोराकळे ता.नांदगाव


“3 लाख 31 हजार कर्जत्याचे व्याज 11 लाख 26 हजार झाले, म्हणजे मुद्दलीच्या चौपट व्याज हा कोणता न्याय? 3 कर्जाच्या 15 लाख रुपये वसुलीचा तगादा लावत आहे. एक रुपया देखील भरणार नाहीं

शिवाजी महादु पाटील

  • नांदगाव

Comments are closed.