अमरावती/एनजीएन नेटवर्क
शहरात चक्क तळीरामांचे संमेलन भरले आहे. विशेष म्हणजे आजी-माजी असे 200 मद्यपी या संमेलनात सामील होऊन आपल्या अनुभवांचे कथन केले. हे संमेलन तळीरामांनी एकत्र येऊन आयोजित केलेले नाही तर अल्कोहोलिक्स ऍनानिमस संस्थेच्या पुढाकारातून हे अनोखे संमेलन भरवण्यात आले आहे. दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. आर्थिक परिस्थिती खालावते, आरोग्याची समस्य उद्ध्भवते. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी हे संमेलन भरवण्यात आले आहे.
दारुच्या आहारी गेलेले डॉक्टर, प्राध्यापक, अभियंतेही या संमेलनात सामील झाले आहेत. व्यसनाच्या आहारी कसे गेले आणि त्यातून बाहेर कसे आले याचे कथन या सर्व जणांनी केले. राज्यात वर्धा आणि गडचिरोलीत दारुबंदी आहे. चंद्रपुरातही दारुबंदी होती. मात्र ती उठवण्यात आली. हे तीनही जिल्हे विदर्भातले. आता विदर्भातल्याच अमरावतीत दारुविरोधी जनजागृतीसाठी संमेलन भरवण्यात आले.