ला.राजेंद्र जाधव लायन्स क्लब पंचवटीच्या ३७ व्या अध्यक्षपदावर विराजमान
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
लायन्स पंचवटी शहरातील अत्यंत जुनी सेवाभावी आणि ३६ वर्षांचा सेवेचा अनुभव असणारी संस्था असून तिच्या माध्यमातून अनेक कायमस्वरूपी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आले आहेत. आगामी कुंभमेळ्यामध्ये पंचवटी क्लब चे योगदान मोठे असावे, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल लायन वैद्य विक्रांत जाधव यांनी केले. लायन्स व नाशिक शहरातील अनेकांची तशी इच्छा असून त्या दिशेने पावले टाकावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
लायन्स क्लब नाशिक पंचवटी चा ३७ व पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. ह्या वेळी घरातील व्यक्तीसोबत कार्यक्रम करून बाकी रक्कम कुंभ तील सेवा कार्यासाठी उपयोगात आणण्याचा मानस नूतन अध्यक्षांनी केला. ला.राजेंद्र जाधव ह्यांनी २५-२६ चे अध्यक्षपद, ला.सौ सीमा प्रशांत सोनजे ह्यांनी सचिवपद तर ला. मकरंद महेश सोमण ह्यांनी खजिनदार पदाचा कार्यभार पदग्रहण अधिकारी तथा माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव ह्यांच्या हस्ते स्वीकारला. नवीन सभासदांना शपथ ला. रितू चौधरी ह्यांनी दिली. ह्यावेळी झोनल अधिकारी ला.राजेंद्र कोठावदे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात वैद्य जाधव ह्यांनी लायन्स ही संस्था विविध लोकोपयोगी सेवा कार्य करण्यासाठी नावाजलेली संस्था असल्याचे नमूद केले. प्लास्टिक बाटलीतील पाणी आरोग्यासाठी अहितकारी असून त्याऐवजी तांबे किंवा स्टील बाटल्यांचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली. क्लबने ही मोहीम राबवल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते मोठे कार्य ठरेल, असे त्यांनी सांगितले. क्लबतर्फे नाशिक मेळा स्थानकात लवकरच दोन पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण प्लान्ट लावण्यात येणार असून प्रवाश्यांच्या आरोग्यासाठी ते आवश्यक असल्याची माहितीही त्यांनी दिली. एका खुल्या जागेमध्ये औषधी वनस्पतींची ओळख व लागवड करून नाशिक ची महती बाहेरील व्यक्तींना दाखवण्यात येईल. द्राक्ष व कांद्याची झाडेही येणाऱ्याना पाहायला मिळतील हे सांगितले. कुपोषित मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार ह्यांनी केले असून क्लबतर्फे राबवण्यात आलेल्या कुपोषण निर्मुलन कार्यक्रमात क्लब दत्तक घेईल हे नक्की असे वैद्य जाधव म्हणाले.
लायन राजेंद्र जाधव ह्यांनी अध्यक्षीय भाषणात क्लबतर्फे ५०० हून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येईल असे स्पष्ठ केले .ह्या पद्ग्रहानाचे औचित्य औचित्य साधून गरीब विद्यार्थ्याला सायकल देण्यात आली. गेल्या २१ वर्ष पासून स्त्री रोजगारासाठी स्त्रियांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते. ह्या वेळी दोन स्त्रियांना करण्यात आले त्या बरोबर ९ गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुढील शिक्षणासाठी दिली असून ला.महेश सोमण ह्यांनी सनदी लेखापाल होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या शेवटपर्यंत गरज पडल्यास मदत करण्याचे कबुल केले. पंचवटी क्लब नेहमीच पर्यावरण पूरक कार्य करीत असतात
त्या द्वारे शाडू गणपती, धातूच्या गणपती ह्याचा प्रसार विविध पद्धतीने करणार असल्याचे स्पष्ठ केले .क्लबच्या सोमण कुटुंबातील चार व्यक्ती घरात आलेल्या सुनेसह प्रतीमास वेगवेगळ्या संस्था दत्तक घेतल्या असून त्यांना अखंड मदत करत असतात हे विशेष असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे सांगितले. आगामी काळात ह्र्दय रोग प्रतिबंध,काळजी व प्राथमिक निदान, चिकित्सा केंद्र रवी शंकर मार्गावरील धर्मादाय दवाखान्यात सुरु करण्यात येणार असल्याचे क्लबचे माजी अध्यक्ष सुनील देशपांडे ह्यांनी व्यक्त केले .
ह्यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष प्रशांत सोनजे, अरुण अमृतकर, सुनील देशपांडे, नंदेश यंदे यांसह सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच क्लबचे अनंत हिरे, आनंद अग्रवाल, विनोद पाटील मनीषा पाटील मृणाल पाटील.भारत येवला ज्योती येवला, मृणाल पाटील,सह अनेक सभासद हजार होते. सूत्रसंचालन ला. वृषाली हिरे, वैद्य नीलिमा जाधव ह्यांनी केले. आभार प्रदर्शन सौ सीमा प्रशांत सोनजे ह्यांनी केले तर पसायदानाने पदग्रहण समारंभाचा निरोप झाला.
Comments are closed.