NGN News
Latest Marathi News

नाशकात पैसे वाटपाच्या चर्चेने तणाव; पोलिसांचा सौम्य लाठीमार

  • सावतानगरला सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर प्रकार; परिस्थिती नियंत्रणात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या महापालिका प्रभाग क्रमांक २५ मध्ये सावता नगर परिसरात पैसे वाटप होत असल्याच्या आरोपानंतर काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रभागात भाजप नेते सुधाकर बडगुजर हे निवडणूक लढवत असून त्यांच्या कार्यालाबाहेर आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चेने परिसरात मोठी गर्दी झाली होती. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेत सौम्य लाठीमार करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सावता नगर परिसरात सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या अफवेने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. मतदानाच्या दिवशीच असे आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली. अशातच बडगुजर यांचे राजकीय विरोधक मुकेश शहाणे हे कार्यकर्त्यांना घेवून बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पोहोचले. पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली. गोंधळ वाढल्याने जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Comments are closed.