दिंडोरी/एनजीएन नेटवर्क
तालुक्यातील परमोरी येथील नऊ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला असून त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, अश्विनी ही सायंकाळच्या वेळेस घरून गावाकडे येत असताना मॅकडॉल कंपनी लगत असलेल्या वाहाळातुन अचानक बिबट्याने अश्विनीवर हल्ला केला. तिच्या मानेलाच बिबट्याने पकडले. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिने आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली.आजूबाजूचे शेतकरी धावून आले.तिला दिंडोरी रुग्णालयात दाखल केले असता. डॉ. काळे यांनी प्राथमिक उपचार केले. मानेवर जखमा असल्याने तिला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी ही परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा बळी गेला आहे.त्याचबरोबर बिबट्याचे वास्तव्य गेल्या अनेक वर्षांपासून असल्याने बिबट्याची पैदासही मोठ्या प्रमाणात आहे. नरभक्ष बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी परमोरीचे सरपंच दीपक केदारे, उपसरपंच दिघे दिंडोरी भाजप शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे , पारमोरी चे सामाजिक कार्यकर्ते गणेश गांगोडे, आदींनी केली आहे.