पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र चेंबर आणि हॉटेल संस्कृती यांचा संयुक्त उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर, हॉटेल संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंहस्थ कुंभमेळा २०२७ व कृषी पर्यटन केंद्र संधी या विषयावर शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संस्कृती बँक्वेट हॉल, हॉटेल संस्कृती, बेळगाव ढगा, त्र्यंबकेश्वररोड, नाशिक येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सिंहस्थ व पर्यटन व्यवसायांच्या संधी याविषयी पर्यटन समितीचे चेअरमन दत्ता भालेराव हे मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान महाराष्ट्र चेंबरतर्फे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, प्रमुख अतिथी म्हणून बारामती कृषी पर्यटन केंद्रचे पांडुरंग तावरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, कृषी व ग्रामविकास समितीचे चेअरमन राजाराम सांगळे, पर्यटन समितीचे चेअरमन दत्ता भालेराव हे उपस्थित राहणार आहेत.
चर्चासत्र विनामूल्य असून शेतकऱ्यांनी व पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनी चर्चासत्रास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे अध्यक्ष ललित गांधी, शाखा चेअरमन अंजु सिंघल, को-चेअरमन भावेश मानेक, संजय राठी, पर्यटन समितीतर्फे व हॉटेल संस्कृतीतर्फे पर्यटन समितीचे को-चेअरमन दिग्विजय शिवाजी मानकर व कार्यकारिणी सदस्यांनी यांनी केले आहे.
Comments are closed.