नाशिक/एनजीएन नेटवर्क
जागा प्लॉटच्या खरेदी-विक्री मध्ये वाढत असलेल्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे जनतेला आपली प्रॉपर्टी सुरक्षित कशी ठेवता येईल याबाबत माहिती व्हावी म्हणून येथील असोसिएशन ऑफ रियल इस्टेट कन्सल्टंटसतर्फे ‘प्रॉपर्टी अँड प्रिकॉशन’ या विषयावर ॲड. जयंत जायभावे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उद्या (दि.30) रोजी सायंकाळी 5.30 वा पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे हा कार्यक्रम होणार आहे.
याप्रसंगी नॅशनल असोसिएशन ऑफ रिअलटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सी आर शिवकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास दर्शन चावला, आशीष मेहता, आश्विन रासने, कीर्ती भोसले, किशन मिलाने हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक रिअल इस्टेट कन्सलटंट चे अध्यक्ष वसंत सोनवणे, उपाध्यक्ष प्रशांत अग्निहोत्री,ॲड. जयंत गोवर्धने, विवेक अग्निहोत्री, रशीद पिंजारी,प्रशांत नहार सचिन मोरे,यांनी केले आहे .