देवळा/ महेश शिरोरे
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात काम करत अल्पावधीत खामखेडा पंच क्रोशिसह संपूर्ण जिल्ह्यात समाजसेवेच्या माध्यमातून ठसा उमटवणाऱ्या “शिरोरे प्रतिष्ठान” सामाजिक संस्थेच्या कार्याची भरारी फार मोठी आहे. २०१७ मध्ये संस्थेचे संस्थापक महेश शिरोरे यांनी ग्रामीण भागातील बांधवांच्या , समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, त्याच्या सुख दुःखातील वाटेकरू होण्यासाठी या सामाजिक संस्थेची स्थापना केली. गावातील बांधव, भाऊ बधंकी मित्रपरिवाराच्या साथीने रोवलेल्या ‘शिरोरे प्रतिष्ठान’ सामाजिक संस्थेने सात वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या भरीव कामांमधून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दीनदुबळ्यांचा , समाजाचा , आधारवड, अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शैक्षणिक उपक्रम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, लसीकरण, वृद्धाश्रमात फळे वाटप, गावातील प्राथमिक सुविधा, मंदिर बांधणी, श्री श्रेत्र लायकेश्र्वर पायी दिंडी सोहळ्यास कान टोपी, मफलर, स्वेटर वाटप, 21 पिढ्यांचा शिरोरे परिवाराचा बनविलेला वंशवृक्ष, सामाजिक सहभागातून होणारी कामे, अशा एक ना अनेक क्षेत्रात ‘शिरोरे प्रतिष्ठान’ सामजिक संस्था काम करत आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार, संगणक शिक्षण , आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमात संस्थेने सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. खामखेडा सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेले शिरोरे प्रतिष्ठान चे सामाजिक काम आज सर्वव्यापी व सर्वस्पर्शी झाले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश शिरोरे स्वतः उच्चशिक्षित असून ग्रामीण भागाची त्यांना जाण आहे. या जाणिवेतून प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा योगिता शिरोरे, सचिव पोपट शिरोरे, रमेश शिरोरे ,निखिल शिरोरे , विलास शिरोरे,अतुल शिरोरे, नंदकिशोर शिरोरे, भगवान शिरोरे, प्रविण शिरोरे ,चंद्रकांत शिरोरे, कैलास शिरोरे , दिपक शिरोरे,हेसर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
ग्रामीण भागातील परंपरा जपत, संस्कृती संवर्धन व पर्यावरण जतन करण्याचे भरीव काम शिरोरे प्रतिष्ठान ने केले आहे. शालेय विद्यार्थी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा स्वच्छता अभियान जनजागृतीपासून ज्येष्ठ नागरिक सत्कार व प्रोत्साहन संस्थेच्या वतीने देण्यात येतो, कोरोना महामारीच्या काळात कोविड रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यापासून ते त्यांची पूर्ण कुटुंबाची देखभाल ,भाजीपाला, दूध, आणून देण्यापर्यंत पूर्ण जबाबदारी शिरोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य म्हणून करण्यात आली.त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक ,आरोग्य व पर्यावरण क्षेत्रातील संस्थेच्या कामाचे मान्यवरांनीच नव्हे तर संपूर्णतः महाराष्ट्रात देखील कौतुक केले आहे. आज शिरोरे प्रतिष्ठान ’ सामाजिक संस्थेचे रोपटे वटवृक्षात रूपांतरित होताना दिसत आहे, संस्थेचे पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते यांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे.
संस्थेने राबवलेले सामाजिक उपक्रम
ः १) श्री श्रेत्र लायकेश्वर पायी दिंडी सोहळ्यास मफलर, कानटोपी, स्वेटर वाटप 2) जनता विद्यालयात 10 वी च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 3) भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांना दिल्ली येथे संसदे जाऊन विश्वरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. 4) रस्ते वाहतूक , व परिवहन केंद्रीय मंत्री श्री नितीन जी गडकरी यांना दिल्ली येथे जाऊन महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानीत केले. 5) कोविड काळातील नाशिक जिल्ह्यातील सर्वच शासकीय दवाखाने, खाजगी दवाखाने ,आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक, वैद्यकीय डॉक्टर व त्यांची पूर्ण टीम, मदतनीस, शिपाई, आरोग्यसेविका, रुग्णवाहिका ड्रायव्हर,जुन्या काळातील बाळंतपण करणाऱ्या महिला (दाई), यांना कोविड योद्धा सन्मानपत्र प्रतिष्ठान च्या वतीने वाटप करण्यात आले. 6) कोरोना झालेले व कोरोनाला हरवून आपली तब्येत सुव्यवस्थित करून आलेल्या रुग्णांना देखील कोरोणा योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. 7) राजस्थानातील सोळा कुलस्वामीनी दर्शन यात्रा 100 लोकांचे आयोजन करून सोळा कुलस्वामीनी दर्शन यात्रा उत्कृष्ठ नियोजनातून केलेली सहल 8) श्री बद्रीनाथ केदारनाथ ,बाबा अमरनाथ सह श्री द्वारका दोन धाम यात्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेली दोन धाम यात्रा 9) खामखेडा येथील जुन्या मंदिराच्या उभारणीसाठी केलेली मदत 10)संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा पगार योजना या योजनेतून गरीब महिलांना शासकीय योजनेतून मदत ,पगार मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठान चे उल्लेखनीय कार्य 11) खामखेडा , सावकी या पंचक्रोशीत बऱ्याचशा नागरिकांना रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर जाऊन रेशन कार्ड मिळेपर्यंत केलेले प्रयत्न 12) समाजातील लोकप्रतिनिधी व उच्चस्तरीय विद्यार्थी व विद्यार्थिनी गुणवंतांचा सन्मान 13) खामखेडा पंचक्रोशीत श्री श्रेत्र लायकेश्र्वर मंदिर, श्रीराम मंदिर , श्री गणपती मंदिर, श्री श्रेत्र कैलेश्वर मंदिर येथील सप्ताहाचे केलेले नियोजन 14) श्री गणपती मंदिर येथील दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला कीर्तन व हजारो लोकांचे अन्नदान 15) नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी , पोलिस महानिरीक्षक ,आयुक्त, पोलिस अधीक्षक अश्या सर्वच अधिकाऱ्यांचा चांगल्या कामाबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने केलेला सन्मानपत्र देऊन सन्मान 16) खामखेडा ग्रामीण भागात श्री आई आशापुरी आनंदोत्सव सोहळा , व माहेरवाशिणी स्नेहसंमेलन मेळावा मोठ्या दिमाखदार सोहळयात दोन वेळा आयोजित केला. 17) खामखेडा पंचक्रोशीतील ज्येष्ठ महिलांचा 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून केलेला सन्मान 18) विविध ठिकाणी केलेले वृक्षारोपण जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा…समाजातील दीन-दुःखितांचे अश्रू पुसत, निसर्ग चक्रीवादळ, कोरोना महामारी व कोल्हापुरातील महापुरात संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभे राहून “शिरोरे प्रतिष्ठान” सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महेश शिरोरे स्वतः उच्चशिक्षित असून महेश शिरोरे यांच्या सामाजिक कार्याचा समाजातील संकटग्रस्त व गरजवंतांना आधार वाटत आहे.
समाजाप्रतीची बांधिलकी
आपण या समाजाचे काही देणे लागतो. केवळ या एका साध्या-सोप्या विचारसरणीला अनुसरून व्यवसायातून समाजोपयोगी कामासाठी आणि भविष्यासाठी खर्च करायची सवय अगदी पहिल्या दिवसापासून अंगी जोपासली. खामखेडा सारख्या ग्रामीण भागात बालपण गेल्यामुळे शेजारधर्म, धार्मिक सण-सोहळे, सामाजिक घडामोडी अशा गोष्टी अतिशय जवळून पाहता आल्या. आजी आजोबा ,आई-वडिलांच्या मेहनतीने आपले बालपण आणि शिक्षण अतिशय योग्य पद्धतीने झाले. परंतु, समाज प्रगत करायचा असेल, तर केवळ आपण एकटेच मोठे होऊन चालणार नाही, तर इतरांनीपण मोठे होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील बऱ्याचशा मुलांना नाशिक येथील कंपनी मध्ये आज बरीचशी मुले चांगल्या हुद्द्यावर कामे करीत आहेत. आजही किमान १०-१५ मुलांचे बायोडाटा मोबाईलमध्ये असतात.
मेहनतीला पर्याय नाही
कै. सुनील भाऊ शिरोरे हे त्यांचे आदर्श आहेत. मेहनतीला पर्याय नाही, ही त्यांची शिकवण कायम लक्षात ठेवून आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला सामोरे जायची तयारी असावी, अशी शिकवण त्यांना मोठ्या भाऊकडून मिळाली. आज व्यवसाय करत असतानासुद्धा समाजाच्या सेवेसाठी त्यांनी तन-मन-धन पूर्वक स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या या कार्यात “शिरोरे प्रतिष्ठान”’ सामाजिक संस्थेची, कार्यकर्त्यांची मदत व समाजातील मान्यवरांचा हितचिंतकांची त्यांना मदत होत आहे.
कोरोनाकाळात अखंड सेवा
कोरोनाकाळातील त्यांचे काम उल्लेखनीय असून अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या मदतीने त्यांनी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. रक्तदान, आरोग्य, कोरोना प्रतिबंधक लसीकरण, साहित्य मदत, आर्थिक मदत, अन्नधान्य, कपडे, जनजागृती इत्यादी माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. आदिवासी वाडी-वस्तीवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व आरोग्यविषयक जनजागृतीचे उल्लेखनीय काम सुरू आहे. आध्यात्माची आवड तसेच सामाजिक कामाची आवड असणारे तसेच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे अजातशत्रू खामखेडा भूषण महेश शिरोरे यांचे कार्य हे गगनाला गवसणी घालणारे आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा नंदादीप अखंड तेवत राहील. त्यांच्या या कार्यात शिरोरे प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व हितचिंतकांची सदैव साथ लाभली आहे.
संस्थेच्या कार्याला कौतुकाची थाप
शिरोरे प्रतिष्ठान सामाजिक संस्थेची ही सामाजिक जाणीव समाजसेवेचा आगळावेगळा असा मानदंड आहे. यामुळेच शिरोरे प्रतिष्ठान सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्राची आधारवड आहे. संस्थेने विविध उपक्रमातून समाज सेवेचा घेतलेला वसा कौतुकास्पद असून मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. आज नाशिक जिल्ह्यातील खामखेडा गावातील सामाजिक कार्यात शिरोरे प्रतिष्ठान सामाजिक संस्था अग्रणी आहे.