नाशिक/एनजीएन नेटवर्क
प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला भाजप मुख्यालयी वसंतस्मृती येथे आयोजित कार्यक्रमात संतपूजन, आशीर्वचन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ह.भ.प.भागवताचार्य ॲड.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर शास्त्री यांचे र्माचे पालन या विषयावर व्याख्यान करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी यावेळी धर्म, संस्कृती, परंपरा, संस्कार, अध्यात्म जोपासून भाजपासाठी कार्य करणारा कार्यकर्ता म्हणजे लक्ष्मण सावजी असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, आचार्य तुषार भोसले, ह भ प संजयनाना धोंडगे ह भ प माधवदास महाराज राठी. नाशिक ग्रामीण अध्यक्ष सुनील बच्छाव, नाशिक लोकसभा समन्वयक व नाशिक महानगर माजी अध्यक्ष गिरीश पालवे , महामंडलेश्वर श्री शिवगिरीजी महाराज,महामंडलेश्वर श्री गणेशानंद सरस्वती महाराज, महामंडलेश्वर श्री गिरजानंद सरस्वती महाराज ,ह भ प संजयनाना धोंडगे ,ह भ प माधवदास महाराज राठी. ह भ प आचार्य तुलसी राम महाराज गुट्टे,ह भ प मधुकर महाराज शेलार ,राहुल महाराज साळुंके ,ह भ प सौ कांचनताई जगताप, सौ उर्मिला सावजी, पूर्वा सावजी,दिनकर पाटील, नाना काशिनाथ शिलेदार, सुनील केदार, दिनकर अण्णा पाटील, सुजाता जोशी , सुजाता करजगीकर, रोहिणी ताई नायडू, अनिल भालेराव, कुणाल वाघ आदी उपस्थित होते.
उपस्थित सर्व साधु संत महंतांनी व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांचेवर आपल्या भाषणातून शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मित्र गण नाशिक शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी शुभेछ्या दिल्या. सूत्रसंचालन राहुल महाराज साळुंके तर साधू महंतांचे स्वागत नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले
तत्पूर्वी संत पूजनाच्या सुरवातीला चंद्रशेखर नामपूरकर यांच्या कल्पनेतून रुद्रा फौंडेशन नाशिक आणि लाईफ केअर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पसायदान आरोग्याचे समस्या तुमच्या निराकरण आमचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आरोग्य विषयक सल्ला आणि मार्गदर्शन तसेच संजीवनी कार्ड वाटप या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन महानगर भाजप च्या वतीने वैद्यकीय आघाडी च्या प्रमुख सहभागाने केले होते डॉक्टरांच्या मार्गदर्शनात आपल्याला आपल्या शारीरीक व्याधींवर मार्गदर्शन या वेळी करण्यात आले याचा लाभ नाशिक महानगरातील अनेक लाभार्थी नी घेतला..