NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गुजरातमधील ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनासाठी पावागढ येथे महेंद्रा क्लबचे नवे रिसॉर्ट!

0

मुंबई : गुजरातमधील प्राचीन वास्तुकलेचा वारसा लाभलेल्या पावागढ येथे महेंद्रा क्लबकडून नवे रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहे. ‘क्लब महेंद्रा पावागढ रिसॉर्ट’ या नावाने हे नवे रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहे. ‘महेंद्रा हॉलीडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड’चा महत्त्वाचाभाग असलेल्या महेंद्रा क्लबकडून हे नवे रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहे. या नव्या रिसॉर्टमुळे पावागढमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले चंपानेर-पावागढ आर्किओलॉजिकल रिसॉर्ट, प्राचीन कालिका मंदिर आणि जंबूघोडा वन्यजीव अभयारण्य या ठिकाणांना भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोठमोठ्या पर्वतरांगामधील विस्तीर्ण शेती, प्राचीन वास्तू पाहण्यासाठी पर्यटक आता ‘क्लब महेंद्रा पावागढ रिसॉर्ट’ला भेट देत, आरामदायी सोईसुविधांचा लाभ घेऊ शकतात. 

रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून आराम मिळावा, म्हणून  निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले ‘क्लब महेंद्रा पावागढ रिसॉर्ट’ हा पर्यटकांना उत्तम पर्याय ठरेल. वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, सुरत, उदयपूर, नाशिक, उज्जैन आणि इंदौरमधील पर्यटकांना हे रिसॉर्ट सहज गाठता येईल.

पावागढ येथील निसर्गसंपन्नता पाहता, येथील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे हौशी पर्यटकांना पाहता येतील. येथील प्रगल्भ सांस्कृतिक वारसा पावागढला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला खुणावेल. वैविधतेने नटलेल्या पावागढला भेट देण्यासाठी ‘क्लब महेंद्रा पावागढ रिसॉर्ट’ची निवड नक्कीच सार्थकी ठरेल. रिसॉर्टला भेट देणारे पर्यटक आपल्या परिवारासह आरामदायी
आणि सुस्वच्छ खोल्यांचा आनंद घेऊ शकतात. ७ एकर विस्तीर्ण जागेवर पर्यटकांसाठी १०० खोल्या उपलब्ध आहेत. फुलांची रास असलेले बगीचे, स्विमिंग पूल, चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद देणारी उपहारगृहे, तसेच मनोरंजनासाठी
विविध केंद्रे रिसॉर्टमध्ये उपलब्ध आहेत. रिसॉर्टला भेट देण्यासाठी आता बुकिंग उपलब्ध झाल्या आहेत. क्लब महेंद्राच्या संकेतस्थळ आणि अ‍ॅप्लिकेशनवर पावगढ रिसॉर्टची बुकिंग करता येईल. 

क्लब महेंद्रा पावागढ रिसॉर्टचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी अधिक माहिती देताना महिंद्रा हॉलीडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज भट म्हणाले की, “पावागढ येथे रिसॉर्ट उभरल्याने आमच्या सदस्यांना आरामदायी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आमच्या सदस्यांना आराम मिळावा,
यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो.’’ युनेस्कोचा दर्जा लाभलेल्या चंपानेर-पावागड आर्किओलॉजिकलं पार्कचे रिसॉर्टमधून सहज दर्शन घडते. पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात प्राचीन आणि दुर्लभ संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी आम्ही हे रिसॉर्ट उभारले आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.