बंगळूरू/एनजीएन नेटवर्क
उडत्या विमानात दोन वर्षाच्या चिमुरडीच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या चिमुरडीचे प्राण वाचले आहेत. या अनोख्या कामगिरीमुळे संबंधित डॉक्टर चमू सर्वांच्या प्रशंसेच्या भाग बनला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या UK 814 या विमानामध्ये चिमुरडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन वर्षाची चिमुरडी आपल्या पालकांसह या विमानाने प्रवास करत होती. अचानक या मुलीची प्रकृती बिघडली. तिच्या पालकांनी फ्लाइट क्रूला याबाबत माहिती देत मदत मागितली. यानंतर फ्लाइट क्रूने आपत्कालीन सूचना देत इतर प्रवाशांना मुलीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. तसेच कुणी डॉक्टर असल्यास मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले.
‘एम्स’चे पाच डॉक्टर सरसावले
या विमानामधून एम्सचे पाच डॉक्टर प्रवास करत होते. फ्लाइट क्रूची सुचना ऐकून हे डॉक्टर तात्काळ मदतीसाठी धावून आले. डॉक्टरांनी तात्काळ या मुलीची तपासणी केली. ही चिमुरडी सायनोटिक आजाराने ग्रस्त होती. अचानक तिची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी मुलीच्या हृदयाचे ठोके तपासले. तिचे हात पायही थंड होऊ लागले. मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर डॉक्टरांनी या मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी सर्व प्रथम या मुलीला सीपीआर देत तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. विमानात उपलब्ध झालेल्या अत्यंत मर्यादित साधनांच्या मदतीने डॉक्टरांनी या मुलीवर उपचार सुरू केले. दरम्यान, मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांना समजले. डॉक्टरांनी या मुलीवर तबब्ल 45 मिनिटे उपचार सुरू ठेवले. हृदय शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले. डॉक्टरांच्या अतक प्रयत्नांमुळे या मुलीची प्रकृतीत किंचीत सुधारणा झाली आहे. यानंतर तातडीने हे विमान नागपुरात उतरवण्यात आले.विमानतळावर ग्रीन कॉरीडओरच्या माध्यमातून या मुलीला रुग्णालयात पोहचवण्यात आले. यानंतर येथे बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या मुलीवर उपचार सुरु करण्यात आले. येथील डॉक्टरांनी या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.
डॉ. नवदीप कौर (अनेस्थेसिया विभाग), डॉ. दमनदीप सिंग (हृदयविकारविज्ञान), डॉ. ऋषभ जैन (रेडिओलॉजी), डॉ. ओशिका (SR OBG) आणि डॉ. अवचला टॅक्सक (सीनियर कार्डियाक रेडिओलॉजी) अशी या डॉक्टरांची नावे आहेत.