रायपुर/एनजीएन नेटवर्क
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी युवराज मरमट आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी पी मोनिका यांनी अत्यंत साधेपणाने लग्न करत समाजासमोर आदर्श घातला आहे.
युवराज मरमट आणि पी मोनिका यांनी थाटामाटात लग्न करणे टाळत अत्यंत साधेपणाने विवाहबंधनात अडकले. दोघांनीही कोर्टात विवाहगाठ बांधली. महत्त्वाचे म्हणजे इतक्या मोठ्या पदावर आणि खर्च करण्याची ऐपत असतानाही दोघांनी फक्त 2 हजार रुपयात लग्न केले. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी युवराज मरमट यांनी आयपीएस अधिकारी मोनिका यांच्याशी लग्न केले आहे. कोर्ट रुममध्ये त्यांनी एकमेकाला हार घालत सात जन्माच्या शपथा घेतल्या. अत्यंत साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता हा विवाहसोहळा पार पडला. एकमेकांना हार घातल्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित लोकांना मिठाई वाटली. लग्नाासठी लागणारे दोन हार, मिठाई आणि कोर्टाची फी मिळून फक्त 2 हजारात हे लग्न लागले.